बॉलिवूडची ही अभिनेत्री नेहमीच तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असते. सध्या तिच्या एका ट्वीटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. आम्ही बोलतोय इलियाने डिक्रूजबाबत. इलियाना झोपते चालण्याची सवय आहे आणि यामुळे तिच्या पायाला दुखापत होते.
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}} इलियानाने लिहिले आहे की, ''आता या गोष्टीला मी पूर्णपणे स्विकारले आहे की मला झोपेत चालण्याची सवय आहे. सकाळी उठल्यावर एकतर माझ्या पायावर सूज असते किंवा एखादी जखम झालेली असते त्यामुळे यामागचे कारण हेच असावे.'' इलियाने या सवयीमुळे चिंतेत आहे.
इलियानाची ही पोस्ट वाचून तिच्या फॅन्सदेखील आता चिंता वाटू लागली आहे. फॅन्सनी तिला रुममध्ये व्हिडीओ कॅमेरा लावण्याचे सुचवलं आहे.
मध्यंतरी इलियाना तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. दीर्घकाळापासून महिन्यांपासून इलियाना आॅस्ट्रेलियातील फोटोग्राफर अँड्रयूशी नीबॉनला डेट करत होती. मध्यंतरी तिने गुपचूप लग्न केल्याची चर्चा होता. एवढेच नाही तर इलियाना प्रेग्नेंट असल्याचीदेखील चर्चा रंगली होती. मात्र आताश: इलियाना आणि अँड्रयूचे ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. इलियाने इन्स्टाग्रामवरुन अँड्रयूचे सगळे फोटो डिलीट केले आहेत.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर इलियाने अमर अकबर एंथोनी या तेलुगू सिनेमात दिसली होती. लवकरच ती अनीस बाज्मीच्या 'पागलपंती' सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात इलियाना व्यतिरिक्त जॉन अब्राहम, अनिल कपूर, उर्वशी रौतेला आणि अरशद वारसी यांच्या भूमिका आहेत. सध्या सिनेमाचे काही भागाचे शूटिंग हे लंडनमध्ये सुरू आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचे प्लॅनिंग आहेत.