Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभास पंतप्रधान झाला तर सगळ्यात पहिल्यांदा करणार हे काम, पाहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 14:09 IST

सोनी वाहिनीनीने द कपिल शर्मा शोचा एक प्रोमो नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून या व्हिडिओत कपिल एक हटके प्रश्न प्रभासला विचारताना दिसत आहे.

ठळक मुद्देतुला एका दिवसांसाठी पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर तू काय करशील? यावर प्रभास एक मजेशीर उत्तर देताना दिसत आहे. तो सांगतोय, मी इंडस्ट्रीतील मुलाखती सगळ्यात पहिल्यांदा बंद करेन...

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात या कार्यक्रमात आपल्याला दक्षिणेतील एका सुपरस्टारला पाहायला मिळणार आहे. बाहुबली या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे. याच चित्रपटातील नायक प्रभास कपिलच्या शोमध्ये हजेरी लावणार आहे. प्रभास आणि श्रद्धा कपूर द कपिल शर्मा शो मध्ये साहो या त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत.

प्रभास आणि श्रद्धा साहोचे प्रमोशन करण्यासोबतच कपिलच्या टीमसोबत खूप धमाल मस्ती करणार आहेत. या कार्यक्रमात प्रभास आणि श्रद्धा त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील मनोरंजक किस्से प्रेक्षकांना सांगताना दिसणार आहेत. तसेच द कपिल शर्मा शो मध्ये विनोदवीर कपिल बाहुबली फेम प्रभास आणि श्रद्धाची थट्टा मस्करी करताना देखील दिसणार आहे.

प्रभासने बाहुबली या चित्रपटामुळे जगभरातील लोकांचे प्रेम मिळवले आहे. त्याला चांगलीच लोकप्रियता असून त्याच्या विषयी जाणून घ्यायला त्याच्या फॅन्सना नेहमीच आवडते. प्रभास द कपिल शर्मा शोमध्ये येणार असल्याने त्याचे फॅन्स चांगलेच खूश आहेत. सोनी वाहिनीनीने या भागाचा एक प्रोमो नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून या व्हिडिओत कपिल एक हटके प्रश्न प्रभासला विचारताना दिसत आहे. कपिल प्रभासला विचारतो, तुला एका दिवसांसाठी पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर तू काय करशील? यावर प्रभास एक मजेशीर उत्तर देताना दिसत आहे. तो सांगतोय, मी इंडस्ट्रीतील मुलाखती सगळ्यात पहिल्यांदा बंद करेन... हे ऐकल्यावर कपिलच नव्हे तर उपस्थित असलेले सगळेच खळखळून हसताना दिसत आहेत. प्रभासच्या या इच्छेमागे एक खास कारण आहे. प्रभासला जास्त बोलायला आवडत नाही आणि त्याचमुळे त्याला अशाप्रकारच्या मुलाखतीच बंद करायच्या आहेत. 

टॅग्स :प्रभासद कपिल शर्मा शोसाहोश्रद्धा कपूर