Join us  

मूर्ती लहान पण किर्ती महान..! 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्यानं पटकावलं पॉवरलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल, म्हणाला, "उंचीमुळे शाळेत..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 3:22 PM

Mahesh Jadhav: 'लागिरं झालं जी' फेम टॅलेंटची भूमिका महेश जाधवने साकारली होती. त्याने दुसऱ्या महाराष्ट्र राज्य पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२३-२४ या स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले आहे.

छोट्या पड्यावरील 'लागिर झालं जी' मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. मालिकेतील अजिंक्य आणि शीतली यांच्या जोडी प्रमाणेच टॅलेंटदेखील घराघरात पोहचली आहे. टॅलेंटची भूमिका महेश जाधवने साकारली होती. महेश सोशल मीडियावर सक्रीय असून सध्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. महेशनं दुसऱ्या महाराष्ट्र राज्य पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२३-२४ या स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले आहे. 

महेश जाधव याने सोशल मीडियावर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत महेशच्या गळ्यात मेडल दिसत आहे. हा फोटो शेअर करत लिहिले की,  "उंचीमुळे" शाळेत प्रार्थनेच्या रांगेत नं. १ ला उभा, आज तुमच्यासमोर हे गोल्ड घेऊन उभा "फाइटमुळे" आज तुम्हाला सांगायला आनंद होतोय की, 2nd Maharashtra State Para Powerlifting Championship 2023- 24 काल कल्याण येथे झाली. त्यामध्ये Men's 49Kg मध्ये मी गोल्ड मेडल मिळवले. यामागे खुप मेहनत तर आहेच पण  त्याचबरोबर खूप लोकांचा सल्ला, मार्गदर्शन पण आहे. यात मला माझे ट्रेनर कलीम सर ,माझा मित्र विनोद तावरे याचे  खूप सहकार्य मिळाले. 

तो पुढे म्हणाला की, तसेच एखाद्या खेळाडूला प्रॅक्टिस, वर्क आऊटबरोबर डाएट पण खूप महत्वाचे असतो. तशी माझी हे खा हे खाऊ नको बघणारी डॉ. पौर्णिमा डे आणि मला कायम सपोर्ट करत आलेला खूप मोठ्ठा मित्रपरिवार,या सगळ्यांचा मी आभारी आहे. आणि तुम्ही प्रेक्षक कायम माझ्यावर प्रेम करत आला आहात, तर ही दुसरी इनिंग तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा व्यक्त करतो. महेश जाधवच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच कौतुक देखील केले.  

महेश जाधवच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या फकाट या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. तसेच त्याने माऊली या चित्रपटामध्ये आणि कारभारी लय भारी या मालिकेमध्ये देखील काम केले.

टॅग्स :लागिरं झालं जी