Join us
Daily Top 2Weekly Top 5

'१ रुपयाही मी नवाजकडून घेतलेला नाही', पोटगीच्या वादावर संतापली आलिया सिद्दीकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 12:49 IST

Aaliya Siddiqui : 'बिग बॉस ओटीटी २'मधून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची माजी पत्नी आलिया सिद्दीकी बाहेर पडली आहे.

आलिया सिद्दीकी(Aaliya Siddiqui)ला 'बिग बॉस ओटीटी सीझन २' (Bigg Boss OTT 2) मधून दुसऱ्या आठवड्यातील मीड इव्हिक्शनमध्ये घरातून बाहेर काढण्यात आले. शोमधून बाहेर आल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीची एक्स पत्नी आलियाने स्पर्धकांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केले. यावेळी तिने नवाजुद्दीन सिद्दीकीकडून आजपर्यंत पोटगी म्हणून एक रुपयाही घेतला नसल्याचेही स्पष्ट केले. सोबतच तिने इटालियन बॉयफ्रेंडवर मुलीची प्रतिक्रियाही शेअर केली.

आलियाने 'बॉलिवूड बबल'ला सांगितले की, 'मी नवाजुद्दीन सिद्दीकीकडून एक रुपयाही घेतलेला नाही. उलट मला तुमच्याकडून काहीही नको, असे मी त्यांना लेखी दिले आहे. फक्त हे घर माझ्याकडून घेऊ नकोस. कारण हे घर त्यांचे जीवन आहे. मी नवाजकडून पैसे घेतल्याच्या या सर्व खोट्या गोष्टी ऑनलाइनवर सुरू आहेत.

आलियाने नवाजकडून पोटगी म्हणून पैसे घेतले आहेत का?पैशाच्या मुद्द्यावर आलिया सिद्दिकी म्हणाली की, 'मी आजपर्यंत नवाजुद्दीनकडून एक रुपयाही घेतलेला नाही. जे खरे आहे ते मी पुन्हा पुन्हा सांगेन. ते दरमहा खर्चाचे पैसे देतात. कारण हा न्यायालयाचा आदेश होता जो त्याला पाळावा लागणार आहे.

घराबद्दल काय म्हणाली आलिया सिद्दीकीआलिया सिद्दीकीनेही घर न देण्यामागचे कारण सांगितले. ते घर वसवण्यात आणि बांधण्यात तिचाही तितकाच वाटा असल्याचे आलिया सांगते. तिच्या वाट्याला अर्धे घर असल्याचे ती सांगते. तिला तिची थकित कर्जे फेडण्यासाठी ते विकायचे आहे जेणेकरून ती आयुष्यात स्थिर होईल.

इटालियन बॉयफ्रेंडबद्दल आलियाचा खुलासाआलिया सिद्दीकीनेही तिच्या आयुष्यात आलेल्या नव्या व्यक्तीबद्दल सांगितले. त्यांच्या नात्याबद्दल तिने सांगितले की, इटलीमध्ये राहणाऱ्या तिच्या बॉयफ्रेंडचे डोळे तिला आवडतात. जेव्हा ती खूप अस्वस्थ होती तेव्हा त्यानेच तिला आधार दिला होता.

आलियाच्या नात्यावर लेकीची अशी होती प्रतिक्रियाआलिया सिद्दीकीच्या बॉयफ्रेंडबद्दल मुलगी शोराची काय प्रतिक्रिया आहे, ती शेअर केली. आलियाने सांगितले की, तिने शोराशी फक्त एक मित्र म्हणून ओळख करून दिली होती. योग्य वेळ आल्यावर त्या मुलीला या सर्व गोष्टी सांगतील.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी