Join us
Daily Top 2Weekly Top 5

चाकोरीबाहेरील सिनेमांच्या माध्यमातून रसिकांची मनं जिंकण्याचा माझा प्रयत्न असतो- आयुष्यमान खुराणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 16:24 IST

आयुष्यमान सांगतो, "मी कधीच सिनेमाचा बजेट किंवा त्याची भव्यता पाहून सिनेमा निवडलेला नाही. माझ्यासाठी बिग फिल्म म्हणून फक्त हे निकष महत्त्वाचे नाहीत.

हिंदी चित्रपटसृष्टीत हटके आणि तितकाच बोल्ड विषयावर आधारित सिनेमात भूमिका साकारल्याने आयुष्यमान खुरानाने इंडस्ट्रीत आपली एक वेगळीच छाप पाडली आहे.  आजपर्यंत आयुष्यमानने केलेल  सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट झाले आहेत. त्याने केलेल्या सिनेमांना आता 'आयुष्यमान खुरानाचा जॉनर' म्हणून ओळखले जाते आणि त्यानिमित्ताने या बॉलिवुड स्टारने त्याच्यासाठीची 'बिग फिल्म'ची संकल्पना काय आहे, हे सांगितले आहे.

आयुष्यमान सांगतो, "मी कधीच सिनेमाचा बजेट किंवा त्याची भव्यता पाहून सिनेमा निवडलेला नाही. माझ्यासाठी बिग फिल्म म्हणून फक्त हे निकष महत्त्वाचे नाहीत. मी फक्त सिनेमाच्या कंटेंटचा भव्यपणा आणि त्यातील वेगळेपण पाहून सिनेमे निवडतो. माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे. एखाद्या मुद्द्यावर सिनेमा बनला तर त्याने  सिनेमाने देशभरात त्या विषयाला किंवा चर्चेला वाव द्यावा आणि लोकांना त्यांच्या मनात असलेल्या विषयांवर चर्चा करण्यास भाग पाडावे तेव्हाच तो सिनेमा यशस्वी होतो. 

चांगला सिनेमा हा तोच जेव्हा लोकांसाठी, समाजासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या बाबींमध्ये पर्याय देऊ करावेत. मी नेहमी याच दृष्टिकोनातून भव्य या संकल्पनेकडे पाहतो आणि मी ज्या पद्धतीने माझे सिनेमे निवडलेत त्याबद्दल मी आनंदी आहे. कारण, माझ्या या क्षेत्रात बनणाऱ्या सर्वोत्तम सिनेमांमध्ये मी असावं, अशी माझी आधीपासूनच ईच्छा होती. "एक एंटरटेनर म्हणून  चाकोरी मोडणाऱ्या आणि त्याचवेळी प्रचंड मनोरंजक अशा सिनेमांशी स्वत:ला जोडू पाहतो.

 "माझ्या सिनेमांमधून मी प्रत्येकाशी अशा विषयांवर संवाद साधू इच्छितो जे 'टॅबू' मानले जातात, जे विषय महत्त्वाचे असूनही लोकांना स्पष्टपणे मांडता येत नाहीत आणि काहीसे वेगळ्या धाटणीचे असतात. प्रामाणिकपणे सांगायचं तर मी अशा विषयांशीच अधिक जोडला जातो. कारण, ते वेगळे असतात, त्यात अनेक पदर असतात आणि यातून प्रेक्षकांना काहीतरी मिळतं. आजघडीला प्रेक्षकांना काहीतरी नवं, चाकोरी मोडणारं पहायचं आहे आणि एक एंटरटेनर म्हणून सतत प्रयत्न करत राहणं आणि त्यांना आनंद देणं हे माझं लक्ष्य आहे." 

टॅग्स :आयुषमान खुराणा