Join us
Daily Top 2Weekly Top 5

"त्याला मोठं होताना बघता नाही आलं..", मुलाबद्दल बोलताना उषा नाडकर्णी झाल्या भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:36 IST

Usha Nadkarni : उषा नाडकर्णी यांनी अलिकडेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यासह सिनेप्रवासाबद्दल सांगितले.

उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांनी मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. ज्येष्ठ अभिनेत्रीने नुकतेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी मुलाबद्दल बोलताना त्या भावुक झाल्या होत्या.

उषा नाडकर्णी यांनी अलिकडेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यासह सिनेप्रवासाबद्दल सांगितले. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मुलाबद्दलही सांगितले. त्या म्हणाल्या की, त्याचं माझं नातं छान आहे. पण लहानपणी मला काय बघता आलं नाही, कारण मी नोकरी पण करत होती शूटिंग पण करत होती. नाटक पण करत होते. त्यामुळे मुलाला सांभाळणं एक मोठा प्रश्न असतो. तो माझ्या आईमुळे माझा सॉल्व्ह झाला लोकांना जो प्रॉब्लेम असतो की मुलाला कोणाकडे ठेवायचं मुलाला कोण बघेल सगळं माझ्या आईनी केलं. त्यामुळे मी आता याच्यामध्ये मास्टर शेपमध्ये पण रणवीरला बोलले मी की मला मुलाला मोठं होताना बघता नाही आलं. कारण आपली नाटकं म्हटलं की कधी दिवस दुपार रात्र सण काही नसतं ते  म्हणून घरात राहायलाच मिळायचं नाही. पळापळ असायची नुसती. मग अशावेळी पोरांची आबाळ होते ना. मग आई रिटायर झाली होती. म्हणून आईने मुलाला बघितलं त्यामुळे तो तिकडेच राहिला आई पप्पांकडेच. 

त्या पुढे म्हणाल्या की, तो मला म्हणतो ना तू मला जन्म दिला. पण आई माझी ती आहे. माझ्या आईला तो आई म्हणायचा. तिने जास्त सांभाळले आणि माझा मुलगा सहा एक वर्षांचा असताना पप्पा गेले. पण माझ्या भावानी त्याचं सगळं केलं. त्यामुळे आता माझा भाऊ जेव्हा गेला ३० जूनला तेव्हा तो मला म्हणाला, तू फक्त जन्म दिला ती माझी आई होती हा माझा माझा पप्पा होता.

टॅग्स :उषा नाडकर्णी