Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कुणी काम देता का काम', असं म्हणण्याची वेळ आलीय 'अग्निपथ'मध्ये काम केलेल्या या अभिनेत्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 18:57 IST

अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'अग्निपथ'मध्ये काम केलेला हा अभिनेता आर्थिक अडचणीत सापडला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे सिनेइंडस्ट्रीतील कित्येक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काम कमी असल्यामुळे कित्येक कलाकारांना रोजगार नाही आणि त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी पैसेदेखील नाहीत. कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे सिनेइंडस्ट्री पुन्हा उभारी घेताना दिसत आहे. काही कलाकारांनी कामाला सुरूवातदेखील केली आहे. मात्र असे काही कलाकार आहेत ज्यांच्याकडे सध्या काम नाही आणि त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशात अभिनेता रेशम अरोरा ज्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अग्निपथ चित्रपटाव्यतिरिक्त बऱ्याच चित्रपटात काम केले आहे.

रेशम अरोरा यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगितले. ते म्हणाले की, माझ्याकडे आतापर्यंत काहीच काम नाही. अशी नामुष्की तेव्हापासून आली आहे जेव्हा लॉकडाउनला सुरूवात झाली होती. लोक म्हणत आहेत की आता सगळे सुरळीत होत आहे पण आतापर्यंत मला काम मिळण्याबाबत कोणतेच आशेचे किरण दिसत नाही. 

७१ वर्षीय रेशम अरोरा यांनी हेदेखील सांगितले की, त्यांना यादरम्यान स्वास्थ्य समस्या निर्माण झाली होती ज्यामुळे त्यांना आणखी झटका लागला. रेशम अरोरा यांनी सांगितले की, मी काही वर्षांपूर्वी ट्रेनमधून पडलो होतो. त्यानंतर मी अश्विनी धीर यांची मालिका चिडिया घरचे शूटिंग करत होतो तेव्हा माझ्या पायाला किटक चावला. त्यामुळे मला हालचाल करण्यास त्रास होतो. पुढे ते म्हणाले की, ‘मला कामाची खरेच गरज आहे. CINTAAने माझी मदत केली पण आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मला कामाची गरज आहे. मला आर्थिक मदतीची गरज आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चन