Join us

हृता दुर्गुळेच्या नव्या लूकला चाहत्यांची मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 19:41 IST

Hruta Durgule : हृता दुर्गुळे हिने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने नवीन हेअरकट केल्याचे दिसत आहे.

अभिनेत्री ह्रता दुर्गुळे (Hruta Durgule) सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा फॅन फॉलोव्हिंग आहे. नुकताच हृताने नवीन हेअरकट केला आहे. तिने नवीन हेअरकटचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव केला.तिचा नवीन लूक चाहत्यांना खूप भावला आहे.

हृता दुर्गुळे हिने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने नवीन हेअरकट केल्याचे दिसत आहे. ती नवीन हेअरकटमध्ये नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील तिचा नवीन लूक खूप भावतो आहे. तिच्या लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

एका युजरने म्हटलं की, मला आवडला हेअरकट तर दुसऱ्याने म्हटले की, तू या नवीन हेअरकटमध्ये सुंदर दिसत आहेस. अशा अनेक कमेंट आल्या आहेत ज्यात हृताच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. 

हृता दुर्गुळेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. तिने दुर्वा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ती फुलपाखरु या मालिकेत झळकली. या मालिकेमुळेच तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. हृताने अनन्या आणि टाइमपास 3 या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. 

टॅग्स :ऋता दूर्गुळे