Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृतिक रोशनपेक्षाही फिटनेस फ्रीक आहे त्याची आई! व्हिडीओ पाहून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 15:30 IST

बॉलिवूडच्या सर्वाधिक फिट स्टार्सच्या यादीत हृतिक रोशनचे नाव हमखास घेतले जाते. हृतिक त्याच्या फिटनेसबद्दल प्रचंड सजग आहे. तो रोज न चुकता जिममध्ये जातो. पण हृतिकच्या कुटुंबातील एक व्यक्ती हृतिकपेक्षाही फिटनेस फ्रिक आहे. ही व्यक्ती म्हणजे, हृतिकची आई पिंकी रोशन.

ठळक मुद्देपिंकी आणि राकेश रोशन यांचे लग्न १९७० मध्ये झाले.

बॉलिवूडच्या सर्वाधिक फिट स्टार्सच्या यादीत हृतिक रोशनचे नाव हमखास घेतले जाते. हृतिक त्याच्या फिटनेसबद्दल प्रचंड सजग आहे. तो रोज न चुकता जिममध्ये जातो. पण हृतिकच्या कुटुंबातील एक व्यक्ती हृतिकपेक्षाही फिटनेस फ्रिक आहे. ही व्यक्ती म्हणजे, हृतिकची आई पिंकी रोशन.होय, हृतिकच्या आईचे वय ६४ वर्षे आहे. पण या वयात त्या ज्यापद्धतीने जिममध्ये घाम गाळतात, ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पिंकी रोशन सोशल मीडियावर कमालीच्या अ‍ॅक्टीव्ह आहेत आणि त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट नुसते जिमचे फोटो, व्हिडीओंनी भरलेले आहे.

पिंकी रोशन एकही दिवस वर्कआऊट मिस करत नाहीत. वेट ट्रेनिंग, किक बॉक्सिंग, योगा असे सगळे प्रकार त्या करतात. आपल्या आईच्या या फिटनेस प्रेमामुळे हृतिकही प्रभावित आहे. अलीकडे एका मुलाखतीत हृतिक आईबद्दल बोलला होता. माझी आई महिला शक्तीचे एक जिवंत उदाहरण आहे. तिच्या लहान मुलांसारखा उत्साह आहे. ती कायम दुसऱ्यांदा प्रभावित करत असते, असे तो म्हणाला होता.

पिंकी आणि राकेश रोशन यांचे लग्न १९७० मध्ये झाले. ऋतिकचे वडिल राकेश आणि आई पिंकी यांची पहिली भेट दोघांच्या वडिलांमुळे झाली होती. पिंकी यांचे वडिल, डायरेक्टर जे ओम प्रकाश होते आणि ते अनेकदा आपल्या मुलीसोबत रोशन कुटुंबाच्या घरी जायचे.

१९६७ मध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर राकेश यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. याचकाळात पिंकी यांचे कुटुंब त्यांच्यासाठी परफेक्ट मॅच शोधत होते. पिंकी यांच्या वडिलांनी राकेश यांच्यासोबत त्यांचे लग्न ठरवले. राकेश रोशन यांनी १९७० मध्ये पिंकी यांच्याशी लग्न केले. पिंकी यांनी १९७२ मध्ये मुलगी सुनैनाला जन्म दिला. यानंतर १९७४ मध्ये हृतिकचा जन्म झाला.

टॅग्स :हृतिक रोशन