Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझान खानने बॉयफ्रेंडसोबत दाखवला हॉट अंदाज, समोर आले असे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 12:49 IST

Sussanne Khan: सुझान खान सध्या बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत सतत दिसून येते. दोघांच्या एकत्र फोटोसाठी पापाराझीही उत्सुक असतात. मात्र हे दोघेही एकत्र फोटो देण्यास कुठलाही संकोच करत नाहीत

मुंबई - बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोट होऊन अनेक वर्षे झाली आहेत. या दरम्यान, दोघेही जीवनात खूप पुढे गेले असून, त्यांनी नव्या पार्टनर्सची निवड केली आहे. सुझान खान सध्या बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत सतत दिसून येते. दोघांच्या एकत्र फोटोसाठी पापाराझीही उत्सुक असतात. मात्र हे दोघेही एकत्र फोटो देण्यास कुठलाही संकोच करत नाहीत. हल्लीच हे कपल व्यावसायिक बंटी सजदेह याच्या वाढदिवाच्या पार्टीमध्ये एकत्र आले होते. यावेळी सुझान खूप स्टायलिश आणि हॉट अंदाजात दिसली. तर अर्सलान नेहमीप्रमाणे हसत खेळत दिसला. 

व्यावसायिक बंटी सजदेह याने त्याचा ४६ वा वाढदिवस साजरा केला. त्याने मुंबईमध्ये मोठी पार्टी दिली होती. त्यामध्ये बॉलिवूडमधील काही नामांकित चेहरे सहभागी झाले होते. याच पार्टीसाठी अर्सलान गोनी आणि सुझान हेसुद्धा आले होते. अर्सलानने ब्लॅक टी शर्ट आणि ब्ल्यू जिन्स परिधान केली होती. तर सुझान शॉर्ट चेक स्कर्ट घालून आली होती. 

सुझान आणि अर्सलान जेव्हा पार्टीमध्ये आले तेव्हा पापाराझींना त्यांना पोझ देण्याची विनंती केली. त्यानंतर अर्सलान आणि सुझान यांनी थांबून त्यांना पोझ दिल्या. त्यांच्यासोबत त्यांची एक मैत्रीणही होती. त्यानंतर ते पार्टीसाठी गेले. सीमा सजदेहचा भाऊ असलेल्या बंटी सजदेहच्या बर्थडे पार्टीमध्ये अनेक सेलेब्रेटी आले होते.

सुझान खान आणि अर्सलान गोनी हे हल्लीच ऋचा चड्डा आणि अली फझल यांच्या मुंबईत झालेल्या रिसेप्शनमध्येही एकत्र दिसले होते. यावेळी सुझानचा शॉर्ट ड्रेस चर्चेला विषय ठरला होता. पार्टीमध्ये सुझान खानने ब्ल्यू कलरचा वन शोल्डर टॉप आणि प्लीटेड मिनिस्कर्ट घातला होता. मात्र अनेक नेटिझन्सनी या ड्रेसवरून तिला ट्रोल केले होते. 

टॅग्स :सुजैन खानहृतिक रोशनबॉलिवूड