बॉलिवूडच्या चाहत्यांसाठी आणखी एक धक्कादायक बातमी आहे. होय, बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अभिनेता इरफान खान,आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप आणि ज्येष्ठ अभिनेत्री नफीसा अली यांच्या पाठोपाठ अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनाही कॅन्सरने ग्रासले आहे. होय, काही तासांपूर्वी खुद्द हृतिक रोशन याने याबाबतचा खुलासा केला. हृतिकनने डॅड राकेश रोशन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत, याबाबतची माहिती दिली. ‘मी आज सकाळी पापाला फोटोसाठी विचारले. त्यांनी आज सर्जरीच्या दिवशीही जिम मिस केले नाही. मी ज्यांना ओळखतो, त्यात ते सर्वाधिक खंबीर व्यक्तिमत्त्व आहेत. काही आठवड्यांपूर्वी त्यांना गळ्यात squamous cell carcinomaचे (कॅन्सरचा प्राथमिक टप्पा )निदान झाले. पण आजही ते कमालीचे ऊर्जाशील आहेत आणि भावी लढाईसाठी सज्ज आहेत. आम्हा कुटुंबाला इतके खंबीर नेतृत्व मिळाले, याबद्दल आम्ही नशीबवान आहोत. खूप सारे प्र्रेम, डॅड’, असे हृतिकने लिहिले आहे.
Shocking! राकेश रोशन यांनाही कॅन्सर, हृतिक रोशनने खुद्द केला खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 10:45 IST