Join us

'डब्बा कार्टेल' पाहिल्यानंतर थक्क झाली हृतिक रोशनची गर्लफ्रेंड, सई ताम्हणकरचं केलं कौतुक, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 12:37 IST

'डब्बा कार्टेल' पाहिल्यानंतर सबा आजाद थक्क झाली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वेब सीरिजमधील कलाकारांचं कौतुक केलं आहे.

सध्या ओटीटीवरील 'डब्बा कार्टेल' ही वेब सीरिज प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. शबाना आझमी, ज्योतिका, शालिनी पांडे, निमिशा सजयन, गजराज राव अशी स्टारकास्ट असलेल्या 'डब्बा कार्टेल'मध्ये मराठमोळ्या सई ताम्हणकरने महिला पोलिसाची भूमिका साकारली आहे. सईच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. नुकतंच हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आजाद हिनेदेखील 'डब्बा कार्टेल' ही वेब सीरिज पाहिली. 

'डब्बा कार्टेल' पाहिल्यानंतर सबा आजाद थक्क झाली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वेब सीरिजमधील कलाकारांचं कौतुक केलं आहे. तिने सईच्या कामाचंही कौतुक या स्टोरीमध्ये केलं आहे. "फायनली मला एक दिवस सुट्टी मिळाली आणि मी 'डब्बा कार्टेल' ही वेब सीरिज पाहिली. शिबानी दांडेकर मला तुझा अभिमान आहे. हितेश भाटिया आणि संपूर्ण टीमला माझा सलाम! शबाना आझमी तुम्ही पात्र उभं करण्यात मास्टर आहात. तुम्ही लिजंड आहात. सई ताम्हणकर तुला बघणं म्हणजे आनंद आहे. गजराज राव सर तुम्ही कमाल आहात. निमिशाने उत्तम काम केलं आहे. अंजली आणि शालिनी तुम्ही कमाल काम केलं आहे. तुम्हाला अजून स्क्रीनवर पाहायला आवडेल", असं सबाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

सबाची ही पोस्ट सईने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने सबाचे आभार मानले आहेत. 'डब्बा कार्टेल' ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. २८ फेब्रुवारी रोजी ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. तेव्हापासून ही वेबी सीरिज ट्रेंडिंगमध्ये आहे. टिफिन सेवा पुरवणाऱ्या ५ महिलांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या गुपितावर ही वेब सीरिज आधारित आहे. 

टॅग्स :सई ताम्हणकरहृतिक रोशनवेबसीरिज