Zarine Khan Death: बॉलीवूडमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. अभिनेता हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खानच्या आईचं निधन झालंय. सुजैनची आई जरीन कतरक यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं आहे. जरीन या अभिनेता जायद खानची आई आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते संजय खान यांच्या पत्नी होत्या. शुक्रवारी, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून जरीन या वयोमानानुसार अनेक आजारांनी त्रस्त होत्या.
जरीन यांच्या निधनाची बातमी मिळताच खान कुटुंबीयांवर आणि बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर आणि चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. जरीन कतरक या खान कुटुंबाचा आधारस्तंभ होत्या. त्यांच्या पश्चात पती संजय खान आणि त्यांची मुले सुजैन, अरोरा, फराह आणि जायेद खान असा मोठा परिवार आहे.
जरीन कतरक यांनी फॅशन आणि डिझाइनच्या जगात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी नेहमीच त्यांच्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना पाठिंबा दिला. जरीन यांनी त्यांच्या मुलांना यशस्वी करिअर करण्यासाठी कायमच पाठिंबा दिला. आईच्या निधनामुळे सुजैनने दुःख व्यक्त केलंय. याशिवाय त्यांच्या कुटुंबाने मीडिया आणि चाहत्यांना या कठीण काळात त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करण्याची विनंती केली आहे.
Web Summary : Sussanne Khan's mother, Zarine Katrak, passed away at 81 in Mumbai. She was Zayed Khan's mother and Sanjay Khan's wife. The family mourns the loss. She supported her children's careers.
Web Summary : सुजैन खान की मां ज़रीन कतरक का मुंबई में 81 वर्ष की आयु में निधन हो गया। वह ज़ायद खान की मां और संजय खान की पत्नी थीं। परिवार शोक में डूबा है। उन्होंने अपने बच्चों के करियर का समर्थन किया।