Join us
Daily Top 2Weekly Top 5

 सुंदर चेहरा असूनही सुजैन खानने का नाकारले अभिनयाचे क्षेत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 06:00 IST

सुंदर चेहरा, टॅलेंट शिवाय वडिलांची पुण्याई असे सगळे काही तिच्याकडे होते. याऊपरही सुजैनने हिरोईन न होता, इंटेरियर डिझाईनर क्षेत्रात स्वत:चे नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. असे का? तर आता या प्रश्नाचे उत्तरही मिळालेय.

ठळक मुद्देहृतिक व सुजैनची लव्ह स्टोरी प्रचंड शानदार होती. दोघांनीही लग्न केले. पण १३ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर अचानक दोघांनीही घटस्फोट घेतला.

अभिनेता संजय खान यांची मुलगी आणि हृतिक रोशनची एक्स वाईफ सुजैन खान हिच्यात बॉलिवूडची हिरोईन होण्यासाठी लागणा-या सगळ्या गोष्टी होत्या. सुंदर चेहरा, टॅलेंट शिवाय वडिलांची पुण्याई असे सगळे काही तिच्याकडे होते. याऊपरही सुजैनने हिरोईन न होता, इंटेरियर डिझाईनर क्षेत्रात स्वत:चे नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. असे का? तर आता या प्रश्नाचे उत्तरही मिळालेय.

होय, अलीकडे सुजैनने नेहा धूपियाच्या ‘बीएफएफ विद वोग सीझन 3’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी सुजैनने या प्रश्नाचे उत्तर दिले. अभिनयाचा वारसा, सुंदर चेहरा असे सगळे असतानाही तू बॉलिवूडमध्ये करिअर न करण्याचा निर्णय घेतला, असे का? असा प्रश्न नेहाने तिला केला. यावर सुजैनने अगदी सविस्तर उत्तर दिले. तिने सांगितले की, ‘मी पाच वर्षांचे होते, तेव्हाच इंटेरियर डिझाईनचा किडा माझ्यात शिरला होता. त्याकाळात माझी आई इंटेरियर डिझाईनर होती. पाच वर्षांच्या वयात तिच्या अनेक साईटवर मी तिच्यासोबत जायचे. याच ठिकाणी मी या जगाच्या प्रेमात पडले. मला या जगाचा भाग बनायचे होते. त्यामुळे अभिनयाकडे मी कधीच आकर्षित झाले नाही. तसेही जोपर्यंत एखादे काम मला १०० टक्के आकर्षित करत नाही, तोपर्यंत मी त्याकडे वळत नाही. मला फिल्मी दुनिया आवडते. पण मी माझ्या कामावर अधिक प्रेम करते. त्यात मी आनंदी आहे.’

हृतिकसोबतच्या पहिल्या भेटीबद्दलही सुजैन बोलली.  शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी लॉस एंजिल्सला गेले. तिथून परत आल्यावर मला एक सुपरस्टार तरूण भेटला. तो त्यावेळी सुपरस्टार नव्हता. पण माझ्या नजरेत तो सुपरस्टार होता. नशीबाने मला पुन्हा त्याच फिल्मी दुनियेत आणले, असे सुजैन म्हणाली.हृतिक व सुजैनची लव्ह स्टोरी प्रचंड शानदार होती. दोघांनीही लग्न केले. पण १३ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर अचानक दोघांनीही घटस्फोट घेतला. दोघांनाही दोन मुले आहेत.

टॅग्स :सुजैन खानहृतिक रोशन