Join us
Daily Top 2Weekly Top 5

३० हजाराचा क्राउड... काकांसोबत आलेला मुलगा गर्दीत हरवला.. गांगरला...; सोनू निगमनं पुढे जे केलं ते सगळ्यांनाच भावलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:01 IST

प्रसिद्ध गायक सोनू निगम सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. कर्नाटकच्या हुबळीमध्ये आयोजित एका संगीत कार्यक्रमादरम्यान सोनूने गर्दीत हरवलेल्या मुलासोबत केलेली कृती लोकांच्या पसंतीस उतरली आहे

प्रसिद्ध गायक सोनू निगम सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. कर्नाटकच्या हुबळीमध्ये आयोजित एका संगीत कार्यक्रमादरम्यान सोनू निगमने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका हरवलेल्या लहान मुलाची त्याच्या काकांशी भेट होऊ शकली. सोनूच्या या कृतीचे सोशल मीडियावर त्याचं प्रचंड कौतुक होत असून चाहत्यांनी त्याला 'खरा हिरो' म्हटले आहे. काय घडलं नेमकं?

सोनू निगमच्या कृतीने जिंकलं सर्वांचं मनहुबळीमध्ये सोनू निगमच्या कॉन्सर्टसाठी सुमारे ३०,००० हून अधिक चाहत्यांची गर्दी झाली होती. कार्यक्रम रंगात आलेला असतानाच एका लहान मुलाला गर्दीत आपले पालक सापडत नसल्याचे सोनूच्या लक्षात आले. तो मुलगा प्रचंड घाबरलेला होता. ही परिस्थिती पाहताच सोनूने गाणे थांबवले आणि त्या मुलाला मंचावर बोलावून घेतले. सोनूने हात धरुन मुलाला सर्वांसमोर आणले.

मुलाला धीर देण्यासाठी आणि गर्दीतून त्याच्या पालकांचे लक्ष वेधण्यासाठी सोनूने मंचावरच त्या मुलाचा हात धरुन एक उत्स्फूर्त गाणे गायला सुरुवात केली. "श्री साई आ जाओ, मम्मी-पापा इसको ले जाओ... इसके मम्मी-पापा खो गए हैं, जल्दी आके इसको ले जाएं।". पुढे श्रीने सोनूला सांगितलं, ''पप्पा नाही आहेत!'' हे ऐकताच सोनू स्तब्ध झाला. ''पप्पा नाही आहेत, मग तू कोणाला शोधत आहेस?'' तेव्हा मुलाने ''काका'' असं उत्तर दिलं.

पुन्हा सोनू निगमने उत्स्फुर्तपणे गायला सुरुवात केली की, ''काका, कुठे आहात काका? तुला सोडून काका काकीसोबत निघून गेले? मोठ्या भावाने तुला या मुलाची जबाबदारी दिली आणि तू काय करतोयस?'', सोनू असं म्हणताच चाहत्यांनी हसून आनंद घेतला. एकूणच इतक्या प्रचंड गर्दीत हरवलेल्या त्या छोट्या मुलाला सोनू निगमने चांगलाच धीर दिला आणि त्याचा हात पकडून गाणं गायलं. चाहत्यांनी सोनूने या खास क्षणी गायलेल्या ओळींना 'लॉस्ट किड अँथम' (Lost Kid Anthem) असे नाव दिले आहे. काही वेळाने त्या मुलाची त्याच्या काकासोबत भेट घालून देण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sonu Nigam's kind act: Reunites lost boy with his uncle.

Web Summary : During a concert in Hubli, Sonu Nigam stopped singing when he noticed a lost and scared boy. He brought the boy on stage, sang a song to reassure him, and successfully reunited him with his uncle, earning praise for his compassion.
टॅग्स :सोनू निगमसंगीतकर्नाटकबॉलिवूड