Join us
Daily Top 2Weekly Top 5

अशी झाली 'मन उडु उडु' झालं मालिकेतील कलाकारांची हॉट एअर बलूनची सैर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 17:46 IST

हॉट-एअर बलूनमध्ये 'मन उडू उडू झालं' मालिकेचे काही सिन देखील चित्रित करण्यात आले आहे.

'मन उडू उडू झालं' या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'प्रेक्षकांचे लाडके कलाकार - हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत हे या मालिकेतून रसिकांची पसंती मिळवत आहेत.इंद्रा आणि दिपूच्या जोडीवर आणि या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.पण त्याचसोबत या मालिकेच्या शीर्षक गीतावर देखील प्रेमाचा वर्षाव होतोय.

नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली हि मालिका अल्पावधीत त्यांची आवडती बनली असून त्यातील व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. 'उडू उडू' म्हंटल्यावर आपल्या मनात येते ती म्हणजे 'उंच भरारी' आणि या मालिकेतील इंद्रा आणि दिपू म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे यांनी अशीच उंच भरारी घेतली आहे. हो हे खरं आहे, मालिकेतील या कलाकारांनी हॉट-एअर बलूनची सैर केली आणि आकाशाला गवसणी घातली.

मालिकेच्या प्रमोशनसाठी अशा प्रकारे हटके ऍक्टिव्हिटी करण्यात आली. यासाठी दोन्ही कलाकार अगदी उत्सुक होते आणि त्यांनी या ऍक्टिव्हिटीचा मनसोक्त आनंद घेतला. तसेच या हॉट-एअर बलूनमध्ये मालिकेचे काही सिन देखील चित्रित करण्यात आले आहे. जे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळतील. त्यामुळे हा वेगळा अनुभव टीव्हीवर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी या मालिकेचा एकही भाग चुकवू नये. याबद्दल बोलताना हृता म्हणाली, "मला अजूनही विश्वास बसत नाही आहे कि आम्ही अशी ऍक्टिव्हिटी केली हे माझ्या कल्पेने पलीकडचं होतं. 'मन उडू उडू झालं' म्हणत आम्ही खरोखरच उडतोय."

या अनोख्या अनुभवाबद्दल बोलताना अजिंक्य म्हणाला, "मन उडू उडू झालं या मालिकेला प्रेक्षक खूप उदंड प्रतिसाद देत आहेत याचा आम्हाला खूप जास्त आनंद आहे. 'उडू उडू' या शब्दाशी संदर्भ लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या मालिकेमुळे आम्हाला अनुभवायला मिळत आहेत आणि ही ऍक्टिव्हिटी देखील त्याचाच एक भाग आहे. प्रेक्षकांनी आमच्यावर असंच प्रेम करत राहावं आणि त्यांच्या अफाट प्रेमाने आमची मालिकादेखील लोकप्रियतेची गगनभरारी घेतेय असं म्हणेन."

टॅग्स :ऋता दूर्गुळे