Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॅरी पॉटर फेम डॅनियल रॅडक्लिफने बॉलिवूडमधील या अभिनेत्रीसाठी केला खास व्हिडिओ पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 16:40 IST

या अभिनेत्रीने काहीच वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

ठळक मुद्देडॅनियलने तिला शुभेच्छा देताना म्हटले आहे की, मी येथे जुनैदसोबत असून सान्या तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा... तू तुझा दिवस खूप चांगल्याप्रकारे साजरा करशील अशी माझी आशा आहे. 

हॅरी पॉटर या चित्रपटाने अनेक पिढ्यांवर राज्य केले आहे. या चित्रपटाचे सगळेच भाग हिट ठरले आहेत. या चित्रपटात हॅरी पॉटरची मुख्य भूमिका डॅनियल रॅडक्लिफने साकारली होती. डॅनियलला या चित्रपटामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. डॅनियल जगभरात लोकप्रिय असून त्याच्या सोशल मीडियावर त्याचे फॅन्स नेहमीच त्याला फॉलो करतात. त्याने नुकत्याच एका व्हिडिओद्वारे बॉलिवूड अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दगंल फेम सान्या मल्होत्राचा 25 फेब्रुवारीला वाढदिवस होता. तिने तिचा वाढदिवस तिच्या अतिशय जवळच्या लोकांसोबत सेलिब्रेट केला. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी डॅनियलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो सान्याला विश करताना दिसत आहे. त्याने तिला शुभेच्छा देताना म्हटले आहे की, मी येथे जुनैदसोबत असून सान्या तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा... तू तुझा दिवस खूप चांगल्याप्रकारे साजरा करशील अशी माझी आशा आहे. 

सान्याचा मित्र जुनैद आणि डॅनियल खूपच चांगले फ्रेंड आहेत. डॅनियलच्या या व्हिडिओमुळे सान्या प्रचंड खूश झाली आहे. ती लवकरच अनुराग बासूच्या लूडू या चित्रपटात अभिषेक बच्चन, आदिय रॉय कपूर, राजकुमार राव आणि फतिमा सना शेखसोबत काम करणार आहे. तसेच शंकुतला देवी या विद्या बालनच्या बहुचर्चित चित्रपटात ती विद्या बालनच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

सान्याने दंगल या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर तिने फटाका, बधाई हो यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या.

टॅग्स :सान्या मल्होत्रा