Join us

'ट्विलाइट' फेम अभिनेत्री क्रिस्टर स्टीवर्टने गर्लफ्रेंडसोबत केलं लग्न, ६ वर्षांपासून करत होते डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 18:07 IST

'Twilight' fame actress Kristen Stewart : 'ट्विलाइट' चित्रपटाच्या सीरिजमधून प्रसिद्धी मिळवलेली हॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टन स्टीवर्ट हिने गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे.

'ट्विलाइट' चित्रपटाच्या सीरिजमधून प्रसिद्धी मिळवलेली हॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टन स्टीवर्ट (Kristen Stewart) हिने गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे. ती जवळजवळ ६ वर्षांपासून डायलन मेयरला डेट करत होती. दोघांच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. क्रिस्टनने अनेक वर्षांपूर्वी बायसेक्शुअल असल्याची घोषणा केली होती.

क्रिस्टन स्टीवर्ट आणि पटकथा लेखक डायलन मेयर अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. 'ट्विलाइट' स्टारने लॉस अँजेलिसमध्ये एका खासगी समारंभात तिच्या गर्लफ्रेंडसोबत लग्नाचे वचन दिले. क्रिस्टनचे तीन वर्षांपूर्वी डायलनसोबत साखरपुडा केला होता. टीएमझेडच्या वृत्तानुसार, ३५ वर्षीय क्रिस्टन स्टीवर्ट आणि ३७ वर्षीय डायलन मेयर यांनी २० एप्रिल २०२५ रोजी ईस्टर संडेला त्यांच्या लॉस अँजेलिसमधील घरी लग्न केले. यावेळी त्यांच्या जवळचे लोक उपस्थित होते. पोर्टलने लग्नाचे फोटो पब्लिश केले आहेत.

क्रिस्टन आणि डायलनला लग्नाचा परवाना मिळाल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न समारंभात त्यांनी अभिनेत्री अ‍ॅशले बेन्सनसोबत काही मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत एकमेकांना 'हो' म्हटले. मात्र, अद्याप त्यांच्या टीमने अद्याप याची पुष्टी केलेली नाही.

२०२१ मध्ये झाली एंगेजमेंटक्रिस्टन आणि डायलन एका चित्रपटात काम करत असताना भेटले. ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा समोर आल्या. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये दोघांनीही इंस्टाग्रामवर त्यांचे नाते जगजाहीर केले. त्यांचे नाते पुढे नेत त्यांनी २०२१ मध्ये लग्न केले. क्रिस्टनने असेही सांगितले की डायलनने तिला प्रपोज केले होते.

क्रिस्टनने बायसेक्शुअल असल्याचे केलं होतं जाहीरक्रिस्टनचा जन्म ९ एप्रिल १९९० रोजी अमेरिकेत झाला. या अमेरिकन अभिनेत्रीने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. ती वयाच्या १२ व्या वर्षापासून ग्लॅमर जगात काम करत आहे. पण तिला द ट्विलाइट सागा चित्रपटाद्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. भारतातही तिचे चाहते खूप आहेत. २०१७ मध्ये तिने स्वतःला बायसेक्शुअल म्हणून घोषित केले.