Join us

संपूर्ण जाधव फॅमिली एकाच फ्रेममध्ये; सिद्धार्थ जाधवने शेअर केला भावंडांसोबतचा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2022 16:00 IST

Siddharth Jadhav: सोशल मीडियावर सक्रीय असलेला सिद्धार्थ अनेकदा त्याच्या लेकींसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. मात्र, यावेळी त्याने त्याच्या आई-वडील आणि दोन भावंडांसोबतचा फोटो शेअर केला आहे.

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav). ऑनस्क्रीन असो वा ऑफस्क्रीन सिद्धार्थचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. कलाविश्वाप्रमाणे सिद्धार्थ सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर तो त्याच्या वैयक्तिक जीवनातील काही गोष्टीदेखील चाहत्यांसोबत शेअर करत असतो. यात अलिकडेच त्याने त्याच्या भावंडांसोबतचा फोटो शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेला सिद्धार्थ अनेकदा त्याच्या लेकींसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. मात्र, यावेळी त्याने त्याच्या आई-वडील आणि दोन भावंडांसोबतचा फोटो शेअर केला आहे. तसंच या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने प्रत्येकाची ओळखदेखील करुन दिली आहे.

दरम्यान, सिद्धार्थने शेअर केलेला फोटो त्याच्या वडिलांच्या वाढदिवशी काढल्याचं दिसून येत आहे. या फोटोमध्ये त्याचा भाऊ लवेश, वडील, आई आणि  पिंकी ताई असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच सिद्धार्थच्या कुटुंबाचा एकत्र फोटो समोर आल्यामुळे तो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. 

टॅग्स :सिद्धार्थ जाधवसेलिब्रिटीसिनेमा