Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या ७९ व्या वर्षी या अभिनेत्याने सातव्या अपत्याला दिला जन्म, खुद्द त्यानेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 15:40 IST

७९ वर्षाच्या ऑस्कर विजेत्या अभिनेत्याने आपल्या सातव्या अपत्याला जन्म दिल्याचा खुलासा या मुलाखतीत केला आहे.

रॉबर्ट डी निरो (Robert De Niro) हे हॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आहेत. जगभरात त्यांचे लाखो चाहते आहेतच, पण भारतातही त्यांचे चाहते आहेत. त्यांच्याकडे हॉलिवूडमधील एक ताकदीचा अभिनेता म्हणून पाहिले जाते. रॉबर्ट डी निरो हे सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. वयाच्या ७९ व्या वर्षी सातव्यांदा बाप झाल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. अबाऊट माय फादर या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रॉबर्ट डी निरो यांनी एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला आहे. ७९ वर्षाच्या ऑस्कर विजेत्या अभिनेत्याने आपल्या सातव्या अपत्याला जन्म दिल्याचा खुलासा या मुलाखतीत केला आहे.

मुलाखतीत त्यांना सहाव्या मुलाबद्दल विचारणा झाल्यावर खुद्द रॉबर्ट यांनीच सांगितले की नुकतेच त्यांना पुन्हा पिता व्हायचे सौभाग्य लाभले आहे. याविषयी रॉबर्ट डी निरो म्हणाले, खरे तर सातव्या मुलाबद्दल विचारू शकता, मला नुकतेच एक मूल झाले आहे. रॉबर्ट डी निरो यांच्या या सातव्या मुलाची आई टिफनी चेन असू शकते असे म्हटले जात आहे. मध्यंतरी एका डिनर डेटदरम्यान तिने तिच्या बेबी बम्पचे फोटोज शेअर केले होते. रॉबर्ट डी निरो यांनी त्यांच्या या नव्या मुलाविषयी फारशी माहिती दिलेली नाही, पण त्यांच्या नजीकच्या लोकांनी या गोष्टीची पुष्टी केलेली आहे.

१९७१ मध्ये रॉबर्ट डी निरो हे प्रथम वडील झाले जेव्हा त्यांनी आपल्या पूर्वपत्नीच्या मुलीला दत्तक घेतले. या दोघांना ४६ वर्षांचा एक मुलगादेखील आहे. त्यांना त्यांच्या एक्स-गर्लफ्रेंडकडूनही दोन मुले आहेत. याबरोबरच पूर्वपत्नी ग्रेस हायटॉवरकडून राॅबर्ट डी निरो यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.