Join us
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! या सिंगरने केला म्युझिक इंडस्ट्रीबाबत केला खुलासा, ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 20:00 IST

अमेरिकन महिला सिंगरने हॉलिवूड म्युझिक इंडस्ट्रीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

बॉलिवूड इंडस्ट्री असो वा मराठी सिनेइंडस्ट्री या ठिकाणी स्त्री पुरूष असा मानधनाबाबतीतील भेदभाव किंवा कास्टिंग काऊचसारखी प्रकरणं बऱ्याचदा ऐकायला मिळत असतात. मात्र याला हॉलिवूडदेखील अपवाद नाही. कारण अमेरिकी सिंगर क्रिस्टीना ऐगीलेराने हॉलिवूड म्युझिक इंडस्ट्रीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

वयाच्या १९ व्या वर्षी पहिला म्युझिक अल्बम लाँच करणाऱ्या क्रिस्टीनाने हॉलिवूड म्यूझिक इंडस्ट्रीला पुरूष प्रधान म्युझिक इंडस्ट्री संबोधत म्हणाली की, जेव्हा तुम्ही कमी वय असताना पुरूष प्रधान इंडस्ट्रीत पदार्पण करता तेव्हा ते तुम्हाला पाहून तुमच्यावर टिक्का टिप्पणी करतात. ते माझ्या स्तनाबद्दल बोलले होते.

क्रिस्टीना पुढे म्हणाली की, महिला या पुरूषाच्या दृष्टीकोनातून लैंगिकतेचा विचार करत नाहीत. जर तुम्ही माझ्या काम व निर्णयाकडे पाहिलेत तर ते खूप प्रोग्रेसिव्ह होते. 

निर्भयता कशाच्या बाबतीत मला हवी होती. कारण मी माझ्या आईला पाहिलं आहे ती बऱ्याच ठिकाणी ती कमकुवत होती तर बऱ्याच ठिकाणी तिचं वर्चस्व होते. त्यामुळे एक महिला म्हणून मला कधीच असहाय्य वाटत नाही.

टॅग्स :हॉलिवूड