Join us
Daily Top 2Weekly Top 5

रसेलच्या मुलीचे नाव माबेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2016 21:39 IST

कॉमेडियन रसेल ब्रांड आणि त्याची गर्लफ्रेंड लॉरा गॅलाशेर यांनी त्यांच्या नवजात मुलीचे नाव माबेल असे ठेवले आहे. कॉन्टॅक्ट म्युझिकने ...

कॉमेडियन रसेल ब्रांड आणि त्याची गर्लफ्रेंड लॉरा गॅलाशेर यांनी त्यांच्या नवजात मुलीचे नाव माबेल असे ठेवले आहे. कॉन्टॅक्ट म्युझिकने दिलेल्या माहितीनुसार गेल्या रविवारी ४१ वर्षीय ब्रांड आणि गॅलाशेर यांच्या घरात एका ‘नन्ही परी’चा जन्म झाला. याची बातमी खुद्द रसेल यानेच त्याच्या फॅन्सला दिली. रसेल ब्रांडने इस्ट मिडलॅँड्सच्या नॉटिंघम प्लेहाऊसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात प्रेक्षकांना सांगितले की, मला लवकरच शो पूर्ण करून लॉरा आणि नवजात मुलीच्या जवळ जायचे आहे. मला त्यांची खूप आठवण येत आहे. जेव्हा मला मुलगी झाल्याची बातमी सांगण्यात आली, तेव्हा मला खूप आनंद झाला. मला आता हा शो पूर्ण करून दोघांना भेटायचे आहे. ब्रांड आणि गॅलाशेर गेल्या एक वर्षांपासून एकमेकांना डेट करीत होते. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झाले असून, आता ते लवकरच विवाहाच्या बंधनात अडकतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर ब्रांडवर कन्यारत्न झाल्याबंद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.