Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिहानाच्या बाथटब फोटोमुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 21:12 IST

आपल्या बॉयफ्रेंडसोबतच्या संबंधांबद्दल नेहमीच वादग्रस्त ठरत असलेल्या गायिका रिहाना हिने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. यावेळेस ती बॉयफ्रेंडमुळे ...

आपल्या बॉयफ्रेंडसोबतच्या संबंधांबद्दल नेहमीच वादग्रस्त ठरत असलेल्या गायिका रिहाना हिने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. यावेळेस ती बॉयफ्रेंडमुळे नव्हे तर भाचीसोबत न्यूड आंघोळ केल्याच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार रिहाना तिच्या भाचीसोबत बाथटबमध्ये आंघोळ करीत आहे. यातील काही फोटो तिने इंन्स्टाग्रामवर शेअर केले असून, त्यात ती खुप हॉट दिसत आहे. अर्थात यामुळे वाद निर्माण होणे स्वाभाविक होते. परंतु तिच्या फॅन्ससाठी मात्र रिहानाचे अशा अवस्थेतील फोटो पर्वणीपेक्षा कमी नाहीत. फोटोमध्ये रिहानाने काहीही परिधान केलेले नाही. तिच्या उजव्या हाताच्या बगलमध्ये ‘गन’ टॅटू आणि लांब बट दिसून येत आहे. फोटोत ती भाची मॅजेस्टिनला किस करताना दिसत आहे. दोघीही अतिशय क्यूट दिसत असल्याने फॅन्सकडून तिच्या फोटोला तुफान लाइक्स मिळत आहेत. काही फॅन्स कमेंटच्या माध्यमातून तिचे कौतुकही करीत आहेत. दरम्यान रिहानाने फोटोच्या कॅप्शनमध्ये अनकंडिश्नल (विना अट) असे लिहिले आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात असून, त्यास जोरदार प्रतिक्रि या मिळत आहेत. तिच्या चाहत्यामध्ये यो फोटोवरु न दोन गट तयार झाले असून काहीजण रिहानाची प्रशंसा करीत आहेत, तर काहीजण टीकाही करीत आहेत. मात्र रिहानाने अशाप्रकारचे फोटो पहिल्यांदाच सोशल मीडियावर शेअर केले आहेत, असे अजिबात नाही. यापूर्वी देखील तिने अशाप्रकारचे हॉट फोटो शेअर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ती बॉयफ्रेंडसोबतच्या संबंधांमुळे चर्चेत होती. या फोटोंमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.