Join us
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक, पैसे कमावण्यासाठी या प्रसिद्ध दिग्दर्शकाची मुलगी बनली पॉन स्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 12:18 IST

यावर राम गोपाल वर्मानेही आपले मत मांडले होते, मुलीच्या करिअर चॉइसलर स्टीवनेही सपोर्ट केला. हा एक चांगला बदल आहे.

हॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर स्टीवन स्पीलबर्ग यांची मुलगी मिकेलानं 23 व्या वर्षी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकत सा-यांना  आश्चर्याचा धक्काच दिला आहे.  पॉर्न इंडस्ट्रीमध्ये येण्याआधीच तिनं तिचे सोलो पॉर्न व्हिडीओ शूट केले होते. जेव्हा तिनं तिच्या पालकांना पॉर्न इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा निर्णय सांगितला. तेव्हा त्यांनीही तिच्या या निर्णयाचं समर्थन केलं. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तिच्या चाहत्यांनाही याबाबत सांगितलं होते. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी तिनं तिच्या करिअरवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.

भरपूर पैसा कमवणे हाच एकमेव हेतु माझ्यासमोर आहे. पैसे कमवून मला खूप श्रीमंत व्हायचे आहे. छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला कोणापुढे हात पसरवायचे नाहीत. त्यामुळे पॉर्न इंडस्ट्रीची निवड केल्याचे तिने म्हटले आहे. मिकेलाही स्टीवनची दत्तक मुलगी आहे. पॉर्न इंडस्ट्रीत काम करण्यात काही चुकीचे नाही. मला माझ्यानुसार माझे आयुष्य जगायचे आहे. त्यामुळे मी कुठे आणि कसे काम करावे हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. 

 

 

मध्यंतरी पॉर्न वेबसाइटवर शुगर स्टार माध्यमातून तिने आपले काही व्हिडीओ पोस्ट केले होते. मात्र तिच्याकडे सेक्स वर्कर लायन्संस नसल्यामुळे हे व्हिडीओ काढावे लागले होते.सध्या मिकेला तिच्या लायन्संस मिळण्याची वाट बघत आहे. पैसे कमावण्यासाठी शरिराचा वापर होत नसल्याच्या विचाराने ती खूप त्रस्त झाली होती.याच कारणामुळे तिने सोलो पॉर्न प्रोड्यूस करण्याचा निर्णय घेतला होता. काही लोक माझ्या शरिराला घेऊन निंदाही करत असे त्यामुळे रोज तेच ते ऐकून मी कंटाळले होते. त्यामुळे त्याच शरिराचा वापर करत मला सक्षम बनायचे असल्याचेही तिने म्हटले आहे.

यावर राम गोपाल वर्मानेही आपले मत मांडले होते, मुलीच्या करिअर चॉइसवर स्टीवनेही सपोर्ट केला. हा एक चांगला बदल आहे. जग झपाट्याने बदल असल्याचे यावरून स्पष्ट होते. स्टीवनचे E.T, जॉस, सेविंग प्रायवेट रायन, शिंडलर्स लिस्ट, जुरासिक पार्क सारख्या सुपरहिट हॉलिवूड सिनेमा जगात प्रसिद्ध झाले आहेत.

टॅग्स :राम गोपाल वर्मा