Join us

प्रियांकाची अशीदेखील फजिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 14:59 IST

अँडी कोहेनने तिच्या करिअरच्या सुरुवातीला केलेल्या काही फिल्म्सच्या क्लिप्स दाखवल्या ज्यामध्ये ती आजच्या सारखा प्रगल्भ अभिनय करताना दिसत नाही.

असे म्हणतात की भूतकाळ कधीच आपली पाठ सोडत नाही. याचा प्रत्यय नुकताच ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राला आला. हॉलीवूडमध्ये नाव कमावणाऱ्या प्रियांकाची एका टीव्ही शोवर चांगलीच फजिती झाली. प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही शो ‘वॉच व्हॉट हॅपन्स लाईव्ह’मध्ये पहिल्यांदाच आलेल्या प्रियांकाला होस्ट अँडी कोहेनने तिच्या करिअरच्या सुरुवातीला केलेल्या काही फिल्म्सच्या क्लिप्स दाखवल्या ज्यामध्ये ती आजच्या सारखा प्रगल्भ अभिनय करताना दिसत नाही. काहीसे ‘एम्बॅरसिंग’ वाटणारे हे व्हिडिओ पाहून तिच्यासोबत आलेला ‘स्कँडल’ स्टार टोनी गोल्डविन तर पोट धरून हसत होता.‘क्वांटिको’द्वारे अमेरिकन टीव्हीवर पदार्पण करणारी प्रियांका सध्या हॉलीवूडमध्ये हॉट टॉपिक आहे. मालिकेनंतर ती ‘बेवॉच’मधून मोठ्या पडद्यावरही डेब्यू करीत आहे. तिच्या अभिनयाची भुरळ पडलेल्या अनेकांना तिच्या या क्लिप्समुळे आश्चर्य वाटले असेल.                                                            ‘बाजीराव मस्तानी’, ‘फॅशन’, ‘बर्फी’सारख्या चित्रपटांत अभिनयाचा आदर्श घालून दिलेल्या प्रियांकाने बॉलीवूडमध्ये सुरुवातीला ‘अंदाज’, ‘किस्मत’, ‘मुझसे शादी करोगी’ यासारखे तद्दन सिनेमेसुद्धा केलेले आहेत. त्यामुळे अमेरिकन प्रेक्षकांसाठी ते एकदम शॉकिंग होते.या क्लिप्स कितीही एम्बॅरसिंग असल्या तरी तिने एकदम ‘स्पोर्टिंगली’ ते घेतले. शोमध्ये तिने तिचा प्रवास उलगडून सांगितला. तसेच ‘मिस वर्ल्ड’प्रमाणे हात कसा दाखवायचा याचेसुद्धा तिने प्रात्याक्षिक करून दाखविले. ते पाहून तुम्हाला नक्कीच ‘प्रिन्सेस डायरिज्’ सिनेमातील जुली अँड्रयूज् अ‍ॅना हॅथवेला तसे शिकवतानाची आठवण येईल.                                                                वॉच व्हॉट हॅपन्स लाईव्ह’ : अँडी कोहेन, प्रियांका चोप्रा आणि टोनी गोल्डविनयाबरोबरच तिने अनेक रंजक खुलासेसुद्धा केले. तिने सांगितले की, तिला एका सहकलाकारावर प्रेम जडले होते. तो कलाकार काणे हे मात्र तिने कळू दिले नाही. एवढेच नाही तर केवळ हीरोचा रोल करणारा अ‍ॅक्टर आवडत नाही म्हणून तिने एका सिनेमाची आॅफर धुडकावून लावली होती. तुम्ही स्वत: पाहा -