Join us

घरबसल्या पाहता येणार प्रियंका चोप्राचा 'हेड ऑफ स्टेट' सिनेमा, पण कधी आणि कुठे? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 14:46 IST

'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा हिचा 'हेड ऑफ स्टेट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Heads of State OTT Release: 'देसी गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्रियंका चोप्रा. जगभरात तिचा चाहतावर्ग आहे. बॉलिवूड सोडून प्रियंका चोप्रा आता पूर्णवेळ हॉलिवूडमध्ये सक्रिय झाली आहे. एकामागून एक इंग्रजी चित्रपट आणि वेब सिरीजमुळे प्रियंका चर्चेत राहते. आताही लवकरच तिचा 'हेड ऑफ स्टेट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

'हेड ऑफ स्टेट' चित्रपट हा थ्रिलर आणि अ‍ॅक्शनने भरलेला असणार आहे. त्यामुळे चाहते आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट २ जुलै २०२५ रोजी  ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल. विशेष म्हणजे या चित्रपटात प्रियंका जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत झळकणार आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी चाहेत उत्सुक आहेत. 

'हेड ऑफ स्टेट' शिवाय, प्रियंका एस.एस. राजामौली यांच्या 'SSMB29' या बहुप्रतिक्षित चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं ओडिशामध्ये शुटिंग झाल्याचीही  सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या चित्रपटात महेश बाबू मुख्य भूमिकेत आहे. प्रियंका चोप्रा, एस. एस. एस राजामौली आणि महेश बाबू हे दिग्गज एकत्र काम करत आहेत. देसी गर्ल 'स्काय इज पिंक' या २०१९ साली आलेल्या हिंदी चित्रपटात शेवटची दिसली होती. गेली ५ वर्षे ती कुठल्याही हिंदी किंवा भारतीय सिनेमात दिसलेली नाही. 

टॅग्स :प्रियंका चोप्रा