Oscars 2026 : अकादमी पुरस्कारांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका हॉरर थ्रिलर चित्रपटाने वर्चस्व गाजवले आहे. एका चित्रपटाने तब्बल १६ नामांकने मिळवली आहेत. या कामगिरीसह त्याने 'टायटॅनिक' (१९९७), 'ला ला लँड' (२०१६) आणि 'ऑल अबाउट इव्ह' (१९५०) यांसारख्या चित्रपटांचे 'सर्वाधिक नामांकने' मिळवण्याचे रेकॉर्ड मोडीत काढलेत.
तर तो चित्रपट आहे 'सिनर्स'. काल २२ जानेवारी रोजी ऑस्कर २०२६ च्या नॉमिनेशन्स घोषणा करण्यात आली. यावर्षीच्या ऑस्कर नॉमिनेशन्समध्ये 'सिनर्स'ने इतिहास रचला आहे. ९८ व्या ऑस्करमध्ये 'सिनर्स' ला १६ नामांकने मिळाली. यासह, 'सिनर्स' हा ऑस्करच्या इतिहासात सर्वाधिक नामांकने मिळवणारा चित्रपट बनला आहे.
'सिनर्स'ला सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, कास्टिंग, छायाचित्रण / सिनेमॅटोग्राफी, वेशभूषा रचना, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, चित्रपट संकलन / एडिटिंग, मेकअप आणि हेअरस्टाइलिंग, संगीत (ओरिजिनल स्कोअर), संगीत (ओरिजिनल गाणे), सर्वोत्कृष्ट चित्रपट (Best Picture), प्रोडक्शन डिझाईन, सेट डेकोरेशन, ध्वनी (साउंड), व्हिज्युअल इफेक्ट्स, लेखन (मूळ पटकथा) या श्रेणींमध्ये नामांकने मिळाली आहेत.
वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार झालेला 'सिनर्स' हा १७ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात ३००० कोटी रुपयांहून अधिक कमाई करत यशाचे शिखर गाठले. भारतातही या चित्रपटाने १२० दशलक्ष रुपयांचा गल्ला जमवून प्रेक्षकांची पसंती मिळवली. २ तास १७ मिनिटांच्या या चित्रपटाला ७.५ रेटिंग मिळाले आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक रायन कुगलर यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात मायकेल बी. जॉर्डन, हेली स्टाइनफेल्ड, वुन्मी मोसाकू आणि डेलरॉय लिंडो हे मुख्य कलाकार आहेत. ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 'सिनर्स' हा चित्रपट आता 'जिओ हॉटस्टार' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. दरम्यान, भारताचेही लक्ष या नॉमिनेशन्सवर होते. पण, भारताचा 'होमबाउंड' हा चित्रपट या शर्यतीतून बाहेर पडला.
Web Summary : Horror thriller 'Sinners' made Oscars history with 16 nominations, surpassing 'Titanic'. The film, directed by Ryan Coogler, stars Michael B. Jordan. It's available on Jio Hotstar.
Web Summary : हॉरर थ्रिलर 'सिनर्स' ने 16 नामांकन के साथ ऑस्कर इतिहास रचा, 'टाइटैनिक' को पछाड़ा। रायन कुगलर द्वारा निर्देशित फिल्म में माइकल बी. जॉर्डन हैं। यह जियो हॉटस्टार पर उपलब्ध है।