Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' दिवशी रंगणार ९८ वा ऑस्कर सोहळा; भारतात कधी-कुठे पाहता येणार? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:39 IST

भारतात कधी पाहता येणार ऑस्कर?

जागतिक चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ९८ वा अकादमी पुरस्कार सोहळा १५ मार्च २०२६ रोजी लॉस एंजेलिसमधील प्रसिद्ध 'डॉल्बी थिएटर'मध्ये पार पडणार आहे. यावर्षीच्या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे प्रसिद्ध कॉमेडियन आणि टीव्ही होस्ट कोनन ओ’ब्रायन हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. त्यांच्या खास शैलीमुळे यंदाच्या सोहळ्यात मनोरंजनाची मोठी मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

भारतीय चाहत्यांसाठी यंदाचा ऑस्कर सोहळा अधिक अभिमानास्पद ठरणार आहे, कारण ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा या सोहळ्यात 'प्रेझेंटर' म्हणून सहभागी होणार आहे. प्रियांकासोबतच रॉबर्ट डाउनी ज्युनियर आणि ॲन हॅथवे यांसारखे हॉलिवूडमधील दिग्गज कलाकारही मंचावर विजेत्यांना पुरस्कार प्रदान करताना दिसतील. प्रियांकाच्या उपस्थितीमुळे भारतीय चाहत्यांमध्ये या सोहळ्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

भारतातील प्रेक्षक हा भव्य सोहळा १६ मार्च २०२६ रोजी पहाटे ४:३० वाजल्यापासून पाहू शकतील. भारतात याचे थेट प्रक्षेपण 'स्टार मूव्हीज' चॅनेलवर केले जाणार आहे. तसेच, ज्यांना हा सोहळा ऑनलाइन पाहायचा आहे, त्यांच्यासाठी 'जिओ हॉटस्टार' (Jio Hotstar) ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंगची सुविधा उपलब्ध असेल.

अमेरिकेत हा सोहळा 'एबीसी' (ABC) चॅनेलवर प्रसारित होईल आणि 'हुलु' (Hulu) वर त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. जगभरातील सिनेप्रेमी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाले असून, यंदा कोणते चित्रपट आणि कलाकार ऑस्करवर आपले नाव कोरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 98th Oscars Ceremony: Date, Time, Where to Watch in India

Web Summary : The 98th Academy Awards will be held on March 15, 2026, hosted by Conan O'Brien. Priyanka Chopra will be a presenter. Indian viewers can watch it live on Star Movies and Jio Hotstar from 4:30 AM on March 16, 2026.
टॅग्स :ऑस्करहॉलिवूडप्रियंका चोप्रा