Join us
Daily Top 2Weekly Top 5

नताली पोर्टमॅनला पुन्हा ‘मार्व्हल’सोबत काम करण्याची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 21:40 IST

हॉलिवूड अभिनेत्री नताली पोर्टमॅनला भविष्यात मार्व्हल युनिव्हर्सशी पुन्हा जोडण्याची अपेक्षा आहे. मार्व्हल युनिव्हर्स अमेरिकी कॉमिक्सला प्रकाशित करणे आणि अन्य ...

हॉलिवूड अभिनेत्री नताली पोर्टमॅनला भविष्यात मार्व्हल युनिव्हर्सशी पुन्हा जोडण्याची अपेक्षा आहे. मार्व्हल युनिव्हर्स अमेरिकी कॉमिक्सला प्रकाशित करणे आणि अन्य दुसरे साहित्य प्रकाशित करणारी फ्रेंचाइझी आहे. डेडलाइन डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, नताली पोर्टमॅन ‘थॉर : रॅगनरॉक’मध्ये जेन फोस्टर वैज्ञानिकाच्या भूमिकेत शक्यतो दिसणार नाही. मात्र याचा अर्थ असा होत नाही की, मला कायमचेच मार्व्हलपासून दूर केले गेले, असे तिने स्पष्ट केले आहे. याविषयी नतालीने सांगितले की, मला विश्वास आहे की, एक दिवस मी पुन्हा मार्व्हलच्या सिनेमांत झळकणार. पती बेंजामिन मिलपाइड याच्या दुसºया मुलाला जन्म देण्याच्या प्रतीक्षेत असलेली नताली, वैज्ञानिक जेन फोस्टरची भूमिका पुन्हा साकारण्यास उत्सुक आहे. कारण व्हिजुअल इफेक्ट्सबरोबर चित्रीकरण करणे तिला आव्हानात्मक वाटते. नताली म्हणतेय की, अशा सिनेमांचा आपण भाग असणे खरोखरच अविश्वसनीय आहे. जर त्यात तुम्ही कलाकाराच्या भूमिकेत असाल तर त्याचे शब्दांत वर्णन करता येणार नाही. कारण जेव्हा तुम्ही अशा सिनेमाशी जोडले जाता तेव्हा तुम्हाला ब्ल्यू स्क्रीन आणि काल्पनिकतेवर भरपूर काम करावे लागते. त्यामुळे मी अशा भूमिका नेहमीच आव्हानात्मक समजत आली आहे, असेही तिने स्पष्ट केले.