Join us

एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू अन् रहस्यमय घटना सुरू! सत्यकथेवर आधारित 'हा' हॉरर सिनेमा पाहून होईल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 16:13 IST

एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू अन् रहस्यमय घटना! सत्य घटनेवर आधारित 'हा' हॉरर सिनेमा पाहून थरथर कापाल 

Hollywood Movie: हल्ली ओटीटीवर नवनवीन विषयांवर आधारित आणि वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे बराचसा प्रेक्षकवर्ग या माध्यमाकडे वळला आहे. दरम्यान, २०२४-२५ हे वर्ष हॉरर चित्रपट प्रेमींसाठी एका जणू पर्वणीचं ठरलं. या वर्षांमध्ये मोठ्या पडद्यापासून ते स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपर्यंत, असे अनेक भयपट पाहायला मिळाले ज्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशाच एका भयपटाबद्दल  आपण जाणून घेणार आहोत. जो एका सत्य घटनेवर आधारित आहे. 

२० वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपट सिनेमागृहात पाहताना प्रेक्षकांचा अक्षरश: थरकाप उडाला होता. या चित्रपटात दाखवलेली प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात एका कुटुंबासोबत घडली. या चित्रपटाचं नाव 'द अ‍ॅमिटीव्हिल हॉरर' असं आहे. १९७५ मध्ये  अमेरिकेतील अ‍ॅमिटीव्हिल येथे राहणार्‍या लुट्झ कुटुंबियांसोबत विचित्र अशी घटना घडली होती. अँड्र्यू डग्लस यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात रायन रेनॉल्ड्स, मेलिसा जॉर्ज आणि फिलिप बेकर हॉल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री क्लोई ग्रेस मोरेट्झच्या करिअरमधील हा पहिलाच चित्रपट होता. बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच, हा चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. हा चित्रपट पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. २००५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर याचे अनेक भाग प्रदर्शित झाले. 

अमेरिकेतली रोनाल्ड डीफिओ नावाच्या व्यक्तीने  त्याच्या पालकांची आणि चार भावंडांची हत्या केली. या घटनेने संपूर्ण अमेरिकेला हादरवून टाकलं होतं. त्यानंतर रोनाल्डला २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि २०२१ मध्ये तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली आहे.  तुम्ही हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर पाहू शकता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Family's death, mysterious events: True horror movie will send shivers.

Web Summary : The 'Amityville Horror,' based on a true story of the Lutz family's terrifying experiences, continues to thrill audiences. A man murdered his family; the film vividly recreates the chilling real-life events. Available on Amazon Prime.
टॅग्स :हॉलिवूडसिनेमा