Join us

गाजलेल्या 'मनी हाइस्ट'मधील हॉट नैरोबी भारतात चक्क साडी नेसून रस्त्यावर फिरतेय, वाचा का आली तिच्यावर ही वेळ...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 16:10 IST

तिचा साडीमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध स्पॅनिश सीरिज 'मनी हाइस्ट'ला जगभरातील लोकांची पसंती मिळाली आहे. या सीरीजमधील सगळ्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. यातील एक भूमिका नैरोबीची. नैराबीच्या भूमिकेतील स्पॅनिश अभिनेत्री अब्ला फ्लोर्स जगभरात प्रसिद्ध आहे. मनी हायस्टमध्ये तिची बिनधास्त भूमिका दिसली होती. सध्या तिचा साडीमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

हा फोटो व्हाइसेंटे फेरर या स्पॅनिश चित्रपटातील आहे. या चित्रपटात बहुतांश भारत दाखविला आहे. यात अल्बा गावातील महिला शमीराची भूमिका साकारते आहे. गमतीची गोष्ट म्हणजे या चित्रपटात ती अस्खलित तेलगू बोलतानाही दिसत आहे.  'मनी हाइस्ट' आणि 'व्हाइसेंटे फेरर'मधील तिचे दोन पूर्णपणे भिन्न लुक पाहून लोक आश्चर्यचकित झाले.

व्हाइसेंटे फेररबाबत बोलायचे झाले तर १९६९ च्या पार्श्वभूमीवर आधारित एका माणासाची गोष्ट आहे. जो भारतातल्या अनंतपूर भागाला गरीबीपासून मुक्त करू इच्छितो. त्याला अनंतपूरची कोरडी व धूळयुक्त जमीन सुपीक बनवायची असते. यासाठी तो भारतात येतो. याविषयावर तो अनेक उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा करतो. 

हा चित्रपट २००१ मध्ये  स्पेनमध्ये प्रदर्शित झाला होता. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचा ट्रेलर आणि अल्बा फ्लोर्सचा पारंपारिक लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांना त्यांचा भारतीय वेशातील पारंपारिक लूक खूप आवडतोदेखील आहे.