#MeToo : या मॉडेलनी सांगितली आपबिती; म्हटले, ‘वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी मला नग्न होण्यास भाग पाडले’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 21:40 IST
अमेरिकेची प्रसिद्ध ३५ वर्षीय मॉडेल सारा जिफने तिच्याशी घडलेल्या लैंगिक शोषणाची वेदनादायी कथा सांगितली आहे. सध्या जगभरातील महिला #MeToo ...
#MeToo : या मॉडेलनी सांगितली आपबिती; म्हटले, ‘वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी मला नग्न होण्यास भाग पाडले’ !
अमेरिकेची प्रसिद्ध ३५ वर्षीय मॉडेल सारा जिफने तिच्याशी घडलेल्या लैंगिक शोषणाची वेदनादायी कथा सांगितली आहे. सध्या जगभरातील महिला #MeToo या अभियानाअंतर्गत लैगिंक शोषणाविरोधात आवाज उठवित असून, सारादेखील त्याचा भाग बनली आहे. साराच्या मते, जेव्हा मी १४ वर्षांची होते तेव्हा कास्टिंगच्या एका सेशनमध्ये लैंगिक शोषणाला बळी पडले होते. साराने वयाच्या १४ व्या वर्षीच न्यूयॉर्कमध्ये रनवे शो आणि अॅड कॅम्पेनमध्ये काम करण्यास सुरुवात केली. साराने या भयानक घटनेचा खुलासा करताना म्हटले की, ‘करिअरच्या सुरुवातीला मला कास्टिंग सेशनकरिता एका फोटोग्राफरच्या अपार्टमेंटमध्ये जायचे होते. त्यावेळी माझे आई-वडील उपस्थित नसल्याने मला एकटीलाच या कास्टिंग सेशनला जावे लागले. कॉस्मोपॉलिटन या मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टमध्ये लिहिले की, ‘मी फोटोग्राफरच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचली. त्याने मला सांगितले की, मला अगोदर तुला बिना शर्टमध्ये बघायचे आहे. त्यानंतर त्याने मला पॅण्ट काढण्यास सांगितले. त्यानंतर मी मिकी माउस अंडरवियर आणि स्पोर्ट्स ब्रामध्ये त्याच्यासमोर उभी होती. त्यावेळी माझ्या शरीरात फारसे शारीरिक बदल झालेले नव्हते. त्यानंतर त्याने म्हटले की, आम्हाला तुला बिना ब्राचे बघायचे आहे. त्याने जे मला सांगितले तेच मी केले. त्यावेळी मला नोकरीची गरज असल्याने मी त्याची प्रत्येक गोष्ट ऐकली. मला कळत नव्हते की, हे नेमकं काय होतं आहे.’पुढे वयाच्या पंधराव्या वर्षीही साराला अशाच काहीशा एका अनुभवाचा सामना करावा लागला. ती एक फोटोशूट करण्यासाठी गेली होती. त्याठिकाणी खुलेआम ड्रग्सचे वाटप केले जात होते. त्याठिकाणी तिला नग्न फोटोंसमोर पोज देण्यास सांगितले होते. पुढे वयाच्या १८ व्या वर्षी साराने मॉडेल्सबरोबर नेहमीच घडणाºया अशा प्रकारच्या घटनांवर एक प्रोजेक्ट तयार करून त्यावर काम करण्यास सुरुवात केली. पुढे २०१० मध्ये तिच्या या प्रोजेक्टचे डॉक्युमेंट्रीमध्ये रूपांतर झाले. २०१२ मध्ये साराने मॉडेल्सच्या अधिकारांसाठी एका एनजीओचीही स्थापना केली.