Join us

केंडलने इन्स्टाग्राम अकाऊंट केले डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 18:37 IST

‘इन्स्टाग्राम’ या सोशल साइटमुळे नेहमीच चर्चेत राहणाºया मॉडेल केंडल जेनर हिने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंटच डिलीट केले आहे. तिने अकाऊंट ...

‘इन्स्टाग्राम’ या सोशल साइटमुळे नेहमीच चर्चेत राहणाºया मॉडेल केंडल जेनर हिने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंटच डिलीट केले आहे. तिने अकाऊंट का डिलीट केले याचे स्पष्टीकरण दिले नसल्याने तिचा हा निर्णय फॅन्ससाठी गोंधळात पाडणारा आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, केंडलने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केले आहे. तिचे पेज ओपन केल्यानंतर त्यावर ‘हे पेज उपलब्ध नाही’ अशी सूचना दिली जाते. केंडलचा हा निर्णय तिच्या फॅन्ससाठी धक्कादायक असून, इन्स्टाग्रामवर तिच्या फॅन्सची संख्या लक्षणीय होती. दरम्यान केंडलचे ट्विटर आणि फेसबुक अकाऊंट अजूनही सुरू असल्याने त्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात आहे, मात्र यावरून देखील तिने तिचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट बंद करणार असल्याचे जाहीर न केल्याने, अकाऊंटबाबत सस्पेन्स वाढला आहे. तिच्या जवळच्या मित्रांना याविषयी विचारण्यात आले असता, तेही अनभिज्ञ असल्याने केंडलचे अकाउंट हॅक तर झाले नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु जोपर्यंत याविषयी केंडलकडून अधिकृतरित्या स्पष्ट होत नाही, तोपर्यंत अकाऊंट डिलीटचा सस्पेन्स कायम असेल. केंडल इन्स्टावर खूपच अ‍ॅक्टिव्ह होती. तिने शेअर केलेले स्वत:चे काही फोटोज वादग्रस्त ठरले होते. ती नेहमीच इन्स्टाग्राममुळे चर्चेत असायची. ती तिच्या काही खासगी बाबींही फॅन्ससोबत शेअर करीत असे. परंतु एकाएकी तिने अकाऊंट डिलीट केल्याने फॅन्समध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या अकाऊंटविषयी तिला फॅन्सकडून तिच्या फेसबुक आणि ट्विटरवर अकाऊंटवर मेसेजेसद्वारे विचारणा केली जात आहे. परंतु अद्यापपर्यंत कुठलेही स्पष्टीकरण दिले गेले नाही.