Katy Perry Dating Justin Trudeau : पॉप जगतातील सुपरस्टार गायिका केटी पेरी आणि कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो सध्या चर्चेत आहे. केटी पेरीच्या वाढदिवशी दोघांनी हातात हात घालून चालत आणि फोटोग्राफर्ससमोर हसून पोज देत आपल्या नात्याची सार्वजनिकपणे कबुली दिली होती. या दोघांचे नाते आता अधिक घट्ट झाले आहे. त्यांच्यातील जवळीक वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. नुकतंच केटी आणि जस्टिन यांनी टोकियोमध्ये व्हेकेशन एन्जॉय केलं आहे. या ट्रीपचे काही खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
केटी आणि जस्टिन एकमेकांना भेटण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून ते एकमेकांसाठी वेळ काढत आहेत. नुकतंच जस्टिन ट्रूडो हे दोघे जपानचे माजी पंतप्रधान फुमियो किशिदा आणि त्यांची पत्नी योको यांच्यासोबत एका राजनैतिक भोजनात सहभागी झाले होते. या भेटीनंतर फुमियो किशिदा यांनी फोटो शेअर केला आणि केटी पेरीचा उल्लेख जस्टिन ट्रूडो यांची 'पार्टनर' असा केला. यानंतर जस्टिन ट्रुडो यांनी ही पोस्ट री-शेअर करत लिहिलं, "केटी, मी तुमच्या आणि युकोसोबत वेळ घालवून खूप आनंदी होतो".
केटीनंदेखली इन्स्टावर जस्टिन यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. ४१ वर्षीय पॉप स्टार कॅटी पेरी आणि ५३ वर्षीय राजकारणी जस्टिन ट्रूडो यांना पहिल्यांदा मॉन्ट्रियलमधील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र पाहिले गेले होते. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर हे दोघे सांता बार्बरा येथे एका यॉटवर एकत्र दिसले होते. यॉटवरील त्यांचे अत्यंत रोमँटिक आणि प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोत हे दोघे क्रूझवर एकमेकांना Kiss करताना दिसले होते. त्यानंतर पॅरिसमध्ये एका क्लबमधून बाहेर पडतानाही ते कॅमेऱ्यात कैद झाले. तिथे ते केटीचा वाढदिवस साजरा करत होते आणि दोघेही खूप आनंदी दिसत होते. यानंतर या जोडप्याने अनेक ठिकाणी एकत्र सार्वजनिकरित्या हजेरी लावली आहे. केटी पेरी आणि जस्टिन ट्रूडो यांनी सार्वजनिकपणे आपलं नातं स्वीकारल्यामुळे, जगभरात त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
कॅनडाचे हे माजी पंतप्रधान घटस्फोटित असून, तीन मुलांचे वडील आहेत. १८ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर २०२३ मध्ये जस्टिन यांनी पत्नी सोफीपासून घटस्फोट घेतला होता. तर केटीचं पहिलं लग्न ब्रिटिश विनोदवीर आणि अभिनेता रसेल ब्रँड याच्याशी ऑक्टोबर २०१० मध्ये झालं होतं. पण त्यांचा २०११ मध्ये घटस्फोट झाला. यानंतर २०१६ मध्ये तिने अभिनेता ऑरलँडो ब्लूम याला डेट करायला सुरुवात केली आणि २०१९ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला. ऑगस्ट २०२० मध्ये त्यांना डेझी डोव्ह ब्लूम (Daisy Dove Bloom) नावाची मुलगी झाली. तथापि, अलीकडेच २०२५ मध्ये ते वेगळे झाले. आता केटी पेरी ही जस्टिन यांच्या प्रेमात आहे.
Web Summary : Katy Perry and Justin Trudeau publicly confirmed their relationship, sharing romantic photos from their Tokyo vacation. They've been spotted together frequently, even attending a diplomatic dinner. Trudeau and Perry's relationship is sparking marriage rumors. Both are recently divorced.
Web Summary : केटी पेरी और जस्टिन ट्रूडो ने सार्वजनिक रूप से अपने रिश्ते की पुष्टि की, और टोक्यो की छुट्टियों से रोमांटिक तस्वीरें साझा कीं। वे अक्सर एक साथ देखे जाते हैं, यहाँ तक कि एक राजनयिक रात्रिभोज में भी शामिल हुए। ट्रूडो और पेरी के रिश्ते से शादी की अफवाहें उड़ रही हैं। दोनों का हाल ही में तलाक हो गया है।