Join us

ब्रेकअप, घटस्फोट आणि आता थेट लग्नाआधीच या सिंगरच्या प्रेग्नेंसीची आली न्यूज, Music Video मुळे आले सत्य बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 11:16 IST

'नेवर वॉर्न व्हाइट' या म्युझिक व्हिडीओला थोडे इमोशनल टच दिला आहे त्यामुळे भावूक करणा-या या गाण्याला चाहत्यांकडूनही खूप चांगली पसंती मिळत आहे. सध्या कॅटीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अमेरिकन सिंगर कॅटी पेरीने चाहत्यांना चांगले सरप्राईज दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या ब्रेकअप आणि घटस्फोटामुळेच जास्त चर्चा असायची. मात्र आता ती प्रेग्नंट असून ही गुड न्यूज तिने तिच्या चाहत्यांना दिली आहे. इतके दिवस तिने ती गोष्ट तिच्या चाहत्यांपासून लपवून ठेवली होती. मात्र आता ती वेळ आली आहे असे सांगत तिने  याच निमित्ताने तिने एक म्युझिक व्हिडीओ शेअर केला आहे. यातून ती प्रेग्नंट असल्याचे समोर आले आहे. यांत ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. 

'नेवर वॉर्न व्हाइट' या म्युझिक व्हिडीओत तिने पांढ-या रंगाचा गाऊन घातला आहे. कलरफुल रंगाच्या ड्रेसमध्ये ती सुरूवातील दिसते त्यानंतर ती पांढ-या रंगाच्या गाऊनमध्ये समोर येते. आई बनणार असल्याची ही भावना खूप सुखद असल्याचे तिच्या या गाण्यातून स्पष्ट होते. लवकरच बाळाच्या येण्याने अधिक तिचे आयुष्य आनंदाने भरणार आहे यामुळेच ती खूप खुश असल्याचे पाहायला मिळते. या गाण्याला थोडे इमोशनल टच दिला आहे त्यामुळे भावूक करणा-या या गाण्याला चाहत्यांकडूनही खूप चांगली पसंती मिळत आहे. सध्या कॅटीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हा व्हिडीओ शेअर करत तिने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे. त्यात तिने म्हटले आहे की, यंदाचे उन्हाळा हा माझ्यासाठी खूप बिझी असणार आहे. बॉयफ्रेंड ओरनाल्डो ब्लूमपासून ती प्रेग्नंट आहे. हे तिचे पहिले बाळ असणार आहे त्यामुळे ती सध्या खूप खुश आहे. मात्र कैटीचा बॉयफ्रेंडला पहिल्या लग्नापासून 9 वर्षाचा मुलगा आहे. 2019 मध्ये कैटी भारतातही येऊन गेली आहे.त्यावेळी तिला तुफान पब्लिसिटी मिळाली होती. त्यावेळी कॅटीने रसल ब्रांडसह लग्न केले होते. मात्र त्यांच्यात बिनसले आणि तिने त्यापासून घटस्फोट घेतला.