Join us

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर या पॉप स्टारने सोडले होते करियर, आता केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 13:26 IST

सोशल मीडियावर या पॉप स्टारला अतिशय वाईट शब्दांत ट्रोल करण्यात आल्यामुळे तिने तिच्या करियरला रामराम ठोकला होता.

ठळक मुद्देसूली बँड एफ (एक्स)ची सदस्य असून तिचे खरे नाव चोई जिन री असणार असून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.

दक्षिण कोरियातील सियोलच्या जवळील एका भागात 25 वर्षीय पॉप स्टार सुली ही मृत अवस्थेत आढळली. पोलिसांनीच याविषयी माहिती दिली असून बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितले की, सोमवारी आम्हाला याबाबत कळवण्यात आले होते. तिच्या मॅनेजरला ती घरात मृत अवस्थेत आढळल्यानंतर त्यांनी ही गोष्ट पोलिसांना कळवली होती. पोलिस सध्या तिच्या निधनामागचे खरे कारण शोधत आहेत.

सूली बँड एफ (एक्स)ची सदस्य असून तिचे खरे नाव चोई जिन री असणार असून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. सोशल मीडियावर देखील तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून 50 लाखाहून अधिक लोक तिला सोशल मीडियावर फोलो करतात. 2015 मध्ये सुलीने अभिनयक्षेत्रात करियर करण्याचे ठरवले आणि त्यामुळे तिने तिच्या बँडला रामराम ठोकला होता.

काही वर्षांपूर्वी पॉप स्टाप जोंघ्युनने आत्महत्या केली होती. सुली त्याची चांगली फ्रेंड होती. त्याच्या अंतिम संस्कारात देखील तिने हजेरी लावली होती. आता सुलीच्या निधनाने तिच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सुलीला अतिशय वाईट शब्दांत ट्रोल करण्यात आल्यामुळे तिने तिच्या करियरला रामराम ठोकला होता आणि आता तिचे निधन झाल्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 

टॅग्स :दक्षिण कोरिया