Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध गायिकेचं अवघ्या २४व्या वर्षी निधन, शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट होतेय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 17:36 IST

लोकप्रिय के-पॉप गायिका आणि गीतकार किम नही हिचं निधन झालं आहे. ती फक्त २४ वर्षांची होती. तिच्या निधनाच्या बातमीमुळे चाहत्यांना जबर धक्का बसला आहे.

लोकप्रिय के-पॉप गायिका आणि गीतकार किम नही हिचं निधन झालं आहे. ती फक्त २४ वर्षांची होती. तिच्या निधनाच्या बातमीमुळे चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. ८ नोव्हेंबरला किम नहीचं निधन झालं. तिचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, याचं कारण अद्याप समजलेलं नाही. पण, मृत्यूननंतर तिची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल झाली आहे. 

किम नही हिने मृत्यूच्या काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट केली होती. ७ नोव्हेंबरला तिने तिचे काही फोटो इन्स्टावर शेअर केले होते. या फोटोमध्ये तिने स्वत:बरोबर तिच्या लाडक्या श्वानाचेही काही फोटो शेअर केले होते. किमने या फोटोला कोणतंही कॅप्शन दिलं नव्हतं. तिच्या मृत्यूनंतर आता हे फोटो व्हायरल होत आहेत. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 

कोरियन वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, किम नहीवर शुक्रवारी (१० नोव्हेंबरला) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. किम नहीने २०१९ साली 'ब्लू सिटी' या गाण्यातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. यानंतर तिने अनेक गाणी गायली. चार महिन्यांपूर्वीच तिचं 'रोझ' हे गाणं प्रदर्शित झालं होतं. 

टॅग्स :सेलिब्रिटी