लग्नाच्या बंधनात अडकली ‘गेम आॅफ थ्रोन्स’ची ही जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 15:20 IST
‘गेम आॅफ थ्रोन्स’ ही गाजलेली सीरिज तुम्हाला आठवत असेलच. जगभरातील चाहत्यांनी या अख्ख्या सीरिजला डोक्यावर घेतले होते. आता यातील ...
लग्नाच्या बंधनात अडकली ‘गेम आॅफ थ्रोन्स’ची ही जोडी
‘गेम आॅफ थ्रोन्स’ ही गाजलेली सीरिज तुम्हाला आठवत असेलच. जगभरातील चाहत्यांनी या अख्ख्या सीरिजला डोक्यावर घेतले होते. आता यातील एका जोडप्याबद्दल एक ताजी बातमी आहे. होय,जगभर गाजलेल्या ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या सीरिजचा अभिनेता किट हेरिंग्टन आणि अभिनेत्री रोज लेसली याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. किटने त्याची को-स्टार रोज लेसली हिला आपली आयुष्याची जोडीदार निवडत तिच्यासोबत लग्नगाठ बांधली. शनिवारी हे कपल लग्नबंधनात अडकले. स्कॉटलंडच्या एबरडीन येथे हा विवाहसोहळा पार पडला. या खास सोहळ्याला ‘गेम आॅफ थ्रोन्स’चे अनेक कलाकार आणि हॉलिवूड सेलिब्रिटी हजर होते. किट व लेसली हे दोघेही २०१२ पासून एकमेकांना डेट करत होते. ‘गेम आॅफ थ्रोन्स’ दरम्यान या दोघांची भेट झाली होती. या शोमध्ये दोघांनी जॉन स्रो आणि यग्रीट या प्रेमी जोडप्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिका जगताना किट व रोज कधी प्रेमात पडले, ते त्यांचे त्यांनाच कळले नाही. ग़तवर्षी किट व लेसली यांचा साखरपुडा झाला होता. तूर्तास किट व लेसली यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.