Join us
Daily Top 2Weekly Top 5

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचे बाथरूममध्ये मिळाले होते शव, मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 20:03 IST

या अभिनेत्रीच्या निधनाला इतके दिवस होऊन गेले असले तरी तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्याप मिळालेला नाहीये. 

ठळक मुद्देजेसिकाचा पोस्टमोर्टम रिपोर्ट न मिळाल्याने तिचे निधन कोणत्या कारणामुळे झाले हे शोधण्याचा तिचा परिवार प्रयत्न करत आहे. तिला काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याचमुळे तिचे निधन झाले असेल असे तिच्या कुटुंबियांना वाटत आहे.

अमेरिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री जेसिका कॅम्पबेलचे गेल्या महिन्यात निधन झाले. तिचे पार्थिव २९ डिसेंबरला तिच्या पोर्टलँडमधील घरात मिळाले होते. तिचे निधन कशामुळे झाले हे अद्याप कळलेले नाही. जेसिका ही अभिनेत्री असण्यासोबतच एक फिजिशनदेखील आहे. जेसिकाच्या निधनाला इतके दिवस होऊन गेले असले तरी तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्याप मिळालेला नाहीये. 

जेसिकाचा पोस्टमोर्टम रिपोर्ट न मिळाल्याने तिचे निधन कोणत्या कारणामुळे झाले हे शोधण्याचा तिचा परिवार प्रयत्न करत आहे. तिला काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याचमुळे तिचे निधन झाले असेल असे तिच्या कुटुंबियांना वाटत आहे. जेसिकच्या एका नातलगाने मीडियाशी बोलताना सांगितले होते की, जेसिका दररोजप्रमाणे तिच्या क्लिनिकला गेली होती. त्यानंतर घरी आल्यानंतर कुटुंबातील मंडळींसोबत तिने गप्पा मारल्या आणि ती बाथरूममध्ये गेली. ती खूप वेळ बाथरूममधून परत आली नाही. म्हणून तिची आई तिला पाहायला गेली. पण समोरचे चित्र पाहून तिला धक्का बसला. कारण जेसिका बाथरूममध्ये पडली होती. 

जेसिकाने इलेक्शन या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात रिस विदरस्पूनसोबत तिची जोडी जमली होती. तसेच तिने काही मालिकांमध्ये देखील काम केले आहे. पण अभिनयक्षेत्रात तिला यश मिळाले नाही. त्यामुळे तिने डॉक्टरकीचे शिक्षण घेतले.

टॅग्स :हॉलिवूड