कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. त्यात व्हायरसचे सर्वात जास्त संक्रमण अमेरिका आणि इटलीमध्ये पाहायला मिळाले. या व्हायरसमुळे अनेकांचा बळी गेला आहे. अशात फक्त बॉलिवूड सेलिब्रेटीच नाही तर अनेक हॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा मदतीसाठी पुढे आले आहेत. हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टनने या कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.जेनिफरने या कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी फंड जमा करण्याकरता आपल्या न्यूड फोटोचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. जेनिफरचे हे फोटो 1995 मधील आहेत. त्यावेळी जेनिफर तिचा टीव्ही शो फ्रेंड्समुळे चर्चेत आली होती. तिने सांगितले की या फोटोंच्या लिलावातून तिला जी रक्कम मिळणार आहे ती संपूर्ण रक्कम कोरोना व्हायरस रिलीफ फंडसाठी देणार आहे. याबद्दल तिने इंस्टाग्रामवर सांगितले.
NUDE फोटोंचा ही अभिनेत्री करणार लिलाव, उभारणार कोरोनाशी लढण्यासाठी निधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 10:20 IST