जेडन स्मिथला झाला ‘कायली जेनर’चा भास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 17:11 IST
अनेकदा प्रेम विसरता विसरत नाही. ब्रेक-अपनंतरही तिचा चेहरा सगळीक डे दिसतो. अशीच काहीशी अवस्था विल स्मिथचा मुलगा जेडेनची झाली ...
जेडन स्मिथला झाला ‘कायली जेनर’चा भास
अनेकदा प्रेम विसरता विसरत नाही. ब्रेक-अपनंतरही तिचा चेहरा सगळीक डे दिसतो. अशीच काहीशी अवस्था विल स्मिथचा मुलगा जेडेनची झाली आहे. नुकतेच झालेल्या ‘२०१६ युरोपियन मुझिक अॅवॉर्ड’ सोहळ्यात जेडेनला क्लो फेरीमध्ये त्याची एक्स-गर्लफ्रेंड कायली जेनर दिसली.त्याचे झाले असे की, पुरस्कार सोहळा संपल्यानंतर जेडेन ‘गोर्डी शोर’ स्टार क्लोपाशी गेला. त्याला वाटले की, ती त्याची गतप्रेमिका कायलीच आहे. पण जवळ गेल्यावर जेव्हा त्याला ही चूक लक्षात आली तोपर्यंत स्थिती आॅकवर्ड झाली होती.उपस्थित सुत्रांनुसार, ‘जेडेनच्या अशा वागण्यामुळे प्रथमदर्शनी क्लो चकित झाली. परंतु तिने ओव्हर रिअॅक्ट होण्याऐवजी प्रसंग हसण्यावारी नेला. जेडेन माफी मागत तिला सांगितले की, त्याला वाटले त्याची एक्स गर्लफ्रेंड कायलीच आहे.’ मग दोघे बराच वेळ एकमेकांशी बोलत होते. जेडेन स्मिथ आणि कायली जेनर क्लो फेरीआफ्टर पार्टीमध्ये दोघे अनेक वेळा समोरासमोर आले. तेथे उपस्थित सुत्रांनुसार दोघे खुलेपणाने फ्लर्टिंग करत होते. ब्रेक-अपनंतरही जेडेन आणि कायली चांगले मित्र आहेत.