मनोरंजन विश्वातून एक अभिनेत्री गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अवघ्या २९ व्या वर्षी ही अभिनेत्री गरोदर असल्याची चर्चा आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे 'स्पायडरमॅन' या चित्रपट मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री झेंडया. स्पायडरमॅन सिनेमाच्या नवीन आवृत्तीत पीटर पार्करच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता टॉम हॉलंड आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री झेंडया हे दोघे आई-बाबा होणार असल्याची चर्चा आहे. यामागचं सत्य समोर आलंय.झेंडया खरंच आई होणार?
सोशल मीडियावर झेंडया आणि टॉम हॉलंडचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये झेंडयाने सैल (Loose-fit) कपडे घातलेले दिसत आहेत. हे पाहून चाहत्यांनी ती गरोदर असल्याचा अंदाज वर्तवायला सुरुवात केली आहे. मात्र, या चर्चांना टॉम किंवा झेंडयाकडून कोणतीही अधिकृत पुष्टी मिळाली नाहीये. त्यामुळे सध्या तरी या चर्चाच आहेत. झेंडया खरंच आई होणार असेल तर टॉम आणि तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच ही आनंदाची गोष्ट असेल यात शंका नाही.
झेंडयाबद्दल अशा प्रकारच्या अफवा येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही जेव्हा अशा चर्चा रंगल्या होत्या, तेव्हा झेंडयाची आई क्लेअर स्टॉर्मर यांनी या बातम्यांचे खंडन केले होते आणि लोकांना अशा खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. झेंडया आणि टॉम हॉलंड यांचा काही वर्षांपूर्वी अधिकृतपणे साखरपुडा केला आहे. मात्र, सध्या दोघेही आपापल्या कामात खूप व्यस्त असल्यामुळे ते लग्नासाठी कोणतीही घाई करत नाहीत.
झेंडया सध्या तिच्या आगामी 'द ड्रामा' या चित्रपटात रॉबर्ट पॅटिनसनसोबत दिसणार आहे. याव्यतिरिक्त ती 'युफोरिया सीझन ३', 'ड्युन: पार्ट ३' आणि 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' सारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये काम करत आहे. टॉम आणि झेंडयाची भेट २०१६ मध्ये 'स्पायडर-मॅन: होमकमिंग'च्या सेटवर झाली होती. तेव्हापासून त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. २०२१ मध्ये कारमधील एका किसिंग सीनच्या फोटोमुळे त्यांचे नाते अधिकृतपणे समोर आले होते. २०२४ च्या अखेरीस त्यांनी गुपचूप साखरपुडा केल्याचेही बोलले जात आहे.
Web Summary : Rumors swirl about Zendaya's pregnancy at 29 after viral photos show her in loose-fitting clothes. Neither Zendaya nor Tom Holland have confirmed the news. Previously, Zendaya's mother denied similar claims. They are reportedly engaged but focused on their careers.
Web Summary : वायरल तस्वीरों के बाद 29 साल की ज़ेंडाया की गर्भावस्था की अफवाहें उड़ीं, तस्वीरों में वह ढीले कपड़े पहने हुए हैं। ज़ेंडाया या टॉम हॉलैंड ने अभी तक खबर की पुष्टि नहीं की है। पहले, ज़ेंडाया की माँ ने ऐसे दावों का खंडन किया था। वे कथित तौर पर लगे हुए हैं लेकिन अपने करियर पर ध्यान केंद्रित कर रहे हैं।