ऑस्कर पुरस्कार सोहळा २०२६ वर इराणी हल्ल्याचा धोका आहे. कॅलिफोर्नियाच्या पोलिसांनी याबाबत सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. इराण अमेरिकन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पश्चिमी किनाऱ्यावर ड्रोन हल्ला करू शकते. या इशाऱ्यानंतर अकादमी पुरस्कारांच्या आयोजकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. बुधवारी कॅलिफोर्निया येथे रेड कार्पेटने ऑस्कर सोहळ्याची सुरुवात झाली.
माहितीनुसार, FBI ने अलीकडेच संपूर्ण कॅलिफोर्नियात इराणी हल्ल्याचा इशारा जारी केला आहे. इराणकडून वेस्ट कोस्टवर ड्रोन हल्ला केला जाऊ शकतो. FBI च्या इशाऱ्यावर लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ विभागातील अधिकाऱ्यांनी टिप्पणी करण्यास नकार दिला. परंतु एलए टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आम्ही तयार आहेत आणि दक्षता वाढवली आहे असं सांगितले.
पाहुण्यांच्या सुरक्षेला प्राधान्य
९८ व्या ऑस्कर क्रिएटिव्ह टीमचे एक्झिक्यूटिव्ह प्रोड्यूसर राज कपूर यांनी म्हटलं की, या पुरस्कार सोहळ्याच्या दृष्टीने आमच्याकडे बेस्ट टीम आहेत. आमच्या सुरक्षेचे श्रेय या टीमला जाते. आम्ही दरवर्षी जगभरात काय होतेय ते पाहत असतो. आमच्याकडे FBI आणि LAPD चा सपोर्ट आहे. आम्ही एकत्र मिळून काम करत आहोत असं पाहुण्यांच्या सुरक्षेवरून विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. त्याशिवाय घड्याळ चालते, तसा हा सोहळाही चालत राहील. जे कुणी या सोहळ्यासाठी येतील ते याक्षणाचे साक्षीदार होतील. आम्ही सुरक्षित आहोत. कुठल्याही सुरक्षेला हलक्यात घेतले जाणार नाही. आमच्याकडे सर्व यंत्रणा आहेत असंही त्यांनी म्हटलं.
कधी दिले जाणार ऑस्कर पुरस्कार?
ऑस्कर पुरस्कार सोहळा रविवारी, येत्या १५ मार्च २०२६ रोजी रंगणार आहे. लॉस एंजेलिसमधील हॉलिवूड डॉल्बी थिएटरमध्ये हा कार्यक्रम होईल. त्याचे प्रसारण जगातील २०० देशात केले जाईल. या सोहळ्यात कोने ओ ब्रायन होस्टच्या भूमिकेत राहतील. भारतात १६ मार्च २०२६ रोजी सकाळी हा सोहळा लाईव्ह पाहता येईल.
इराण थेट अमेरिकेवर हल्ला करणार?
इराण अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्यावर एका अज्ञात जहाजाद्वारे घातकी ड्रोन पोहोचविण्याच्या प्रयत्नात आहे. या ड्रोनद्वारे इराण अमेरिकेवर हल्ले चढविणार आहे. इराणने अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यावर ड्रोनद्वारे मोठे हल्ले करण्याची योजना आखल्याचा खुलासा अमेरिकन तपास संस्था FBI ने केला आहे.
Web Summary : FBI warns of potential Iranian drone attacks on US West Coast during the Oscars. Security is heightened at the event in Los Angeles. The award ceremony will be broadcast across 200 countries.
Web Summary : एफबीआई ने ऑस्कर के दौरान अमेरिकी पश्चिमी तट पर संभावित ईरानी ड्रोन हमलों की चेतावनी दी है। लॉस एंजिल्स में कार्यक्रम स्थल पर सुरक्षा बढ़ाई गई। पुरस्कार समारोह का प्रसारण 200 देशों में किया जाएगा।