Join us
Daily Top 2Weekly Top 5

'शी सेड' #MeToo च्या पहिल्या केसवर येतोय हॉलिवूड चित्रपट, कोणती होती ती पहिली केस ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 18:24 IST

काही वर्षांपुर्वी सुरु झालेल्या एका मोहिमेने अख्ख्या जगाचे लक्ष वेधले होते. ते म्हणजे मी टू अभियान. लैंगिक शोषणाविरोधात महिलांनी (विशेषकरून चित्रपटसृष्टीतील) सोशल मीडियातून आवाज उठवला होता.

काही वर्षांपुर्वी सुरु झालेल्या एका मोहिमेने अख्ख्या जगाचे लक्ष वेधले होते. ते म्हणजे मी टू अभियान. लैंगिक शोषणाविरोधात महिलांनी (विशेषकरून चित्रपटसृष्टीतील) सोशल मीडियातून आवाज उठवला होता. बघता बघता ही मोहीम जगभरात पसरली. अनेक महिलांनी पुढे येत झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. त्यानंतर हे #MeToo अभियान नावाने प्रसिद्ध झाले. हे हॅशटॅग वापरुन पीडित महिला लैंगिक शोषणाबाबत मोकळेपणाने बोलायला लागल्या. याच अभियानावर आता पहिला हॉलिवूड चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. युनिव्हर्स पिक्चर्स निर्मित 'शी सेड' असे या सिनेमाचे नाव आहे. १८ नोव्हेंबर ला चित्रपट प्रदर्शित होतोय. 

मी टू च्या सर्वात पहिल्या केसवर 'शी सेड' हा पिक्चर आधारित आहे. चित्रपट निर्माता हार्वे वेनस्टेन वर केलेल्या आरोपांपासून मी टू ची सुरुवात झाल्याचे वृत्त अहवालांमधून कळते. हॉलिवूड निर्माता हार्वे वेनस्टेनवर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. न्युयॉर्क टाईम्सच्या दोन वार्ताहार जोडी कैंटोर आणि मेगन वोहे यांनी निर्माता हार्वे वेनस्टेनवर झालेल्या आरोपांवर अभ्यास केला आणि ते लोकांसमोर आणले. मी टू च्या आरोपांमुळे हार्वे वेनस्टेन सारख्या इतक्या प्रसिद्ध आणि प्रभावशाली निर्मात्याचे खरे रूप समोर आले यावर 'शी सेड' या चित्रपटाची गोष्ट आधारित आहे. हॉलिवूडमध्ये शक्तिशाली असलेल्या या निर्मात्याविरोधात आवाज उठवण्याचे आव्हान या दोन्ही महिला पत्रकारांनी निभावले. त्यांच्या मेहनतीवर हा सिनेमा आधारित असणार आहे. हार्वे वेनस्टेनचा चेहरा जगासमोर आणून पीडित महिलांना न्याय देण्याचे काम या दोघींनी केले. यानंतर या विषयावर अमेरिकेत राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरु झाली आणि त्यामुळे लैंगिक शोषणाच्या घटनांवर प्रकाश पडला. 

शी सेड चित्रपटात केरी मुलिगन या अभिनेत्रीने मेगन वोहे ची भुमिका साकारली आहे तर जो कजान हिने जोडी कैंटोरची भुमिका निभावली आहे. माईक ह्युस्टनने हार्वे वेनस्टेनच्या भुमिकेत आहे. 'शी सेड' हा चित्रपट रिलीज करण्यासाठी निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हार्वे वेनस्टेनच्या वकिलांनी ऑगस्ट महिन्यात चित्रपट रिलीज न करण्यासंदर्भात लॉस एंजिलिस कोर्टात याचिका दाखल केली. मात्र कोर्टाने याचिका फेटाळली. आता हा सिनेमा १८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.