Join us

हॉलिवूडला मिळाला नवा बॅटमॅन, जाणून घ्या कोण आहे हा स्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 19:38 IST

हॉलिवूडचा सर्वात चर्चित व डीसी एक्सटेंड युनिव्हर्सचा प्रसिद्ध सुपरहिरो सिनेमा 'द डार्क नाईट'ला त्याचा नवा बॅटमॅन मिळणार आहे.

हॉलिवूडचा सर्वात चर्चित व डीसी एक्सटेंड युनिव्हर्सचा प्रसिद्ध सुपरहिरो सिनेमा 'द डार्क नाईट'ला त्याचा नवा बॅटमॅन मिळणार आहे. 'द डार्क नाईट'च्या सीक्वलमध्ये अभिनेता रॉबर्ट पैटिनसन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गेले काही दिवस रॉ़बर्टच्या नावाला घेऊन चर्चा सुरू होती. मात्र आता बॅटमॅनच्या भूमिकेत रॉबर्ट पैटिनसनच दिसणार हे निश्चित झालं आहे. 

मागील वर्षी बॅटमॅनची भूमिका करणारा अभिनेता बेन एफ्लेकने द डार्क नाईटच्या सीक्वलमध्ये काम करण्यास नकार दिला होता. त्यानंतर बॅटमॅनच्या भूमिकेत कोण दिसणार याची चर्चा सगळीकडे रंगली बोती. मात्र आता नवीन बॅटमॅनचे वृत्त समोर आलं आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार, द डार्क नाईटच्या सीक्वलमध्ये ट्वाइलाईट फेम रॉबर्ट पैटिनसनची वर्णी लागल्याचे समजते आहे.

रॉबर्ट पैटिनसनने ट्वाइलाईट, हाई लाईफ व गुड टाईम यांसारख्या सिनेमात काम केलंय. मागील वर्षी रॉबर्ट पैटिनसन हाई लाईफ, द लाईटहाऊस व द किंग या सिनेमात झळकला होता. विशेष बाब म्हणजे ३२ वर्षीय रॉबर्ट पैटिनसन बॅटमॅनच्या भूमिकेसाठी सर्वात यंग अभिनेता असेल. डीसी स्टुडिओच्या सिनेमांमध्ये बॅटमॅनची भूमिका एडम वेस्ट, माइकल कीटन, वैल किल्मर, जॉर्ज क्लूनी, क्रिश्चियन बेल आणि बेन एफ्लेक या कलाकारांनी साकारली आहे.

डीसीचा शेवटचा बॅटमॅन बेन एफ्लेक होता. मागील वर्षी एफ्लेकनं सोशल मीडियाच्या माध्यमातून डीसीचा आगामी चित्रपटात बॅटमॅनची भूमिका साकारणार नसल्याचं सांगितलं होतं.

बेन एफ्लेकने द डार्क नाईटच्या सीक्वलमध्ये काम केलं तरी अशीदेखील अफवा आहे की २०२१ साली येणाऱ्या सीक्वलमध्ये तो मरताना दिसेल. त्यानंतरच नवीन बॅटमॅनची एन्ट्री होईल.