Join us

'गेम ऑफ थ्रोन्स' अभिनेत्याचे निधन, अखेर इयान गेल्डरची कर्करोगाशी झुंज संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 17:49 IST

Ian Gelder Dies : 'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये केव्हन लॅनिस्टरची भूमिका साकारणारा ब्रिटिश अभिनेता इयान गेल्डर यांचे निधन झाले आहे. ते कर्करोगाने ग्रस्त होते आणि वयाच्या ७४व्या वर्षी इयान यांनी जगाचा निरोप घेतला.

'गेम ऑफ थ्रोन्स'(Game Of Thrones)मध्ये केव्हन लॅनिस्टरची भूमिका साकारणारा ब्रिटिश अभिनेता इयान गेल्डर (Ian Gelder) यांचे निधन झाले आहे. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. ते कर्करोगाने ग्रस्त होते आणि पित्त नलिकेच्या कर्करोगाच्या गुंतागुंतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी इयान यांनी जगाचा निरोप घेतला. 

गेल्डर यांच्या पत्नी बेन डॅनियल यांनी मंगळवारी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्यांच्या निधनाची बातमी सांगितली. डॅनियल यांनी लिहिले की, "अत्यंत दुःखात आणि जड अंतःकरणाने माझे प्रिय पती आणि जीवनाचे सोबती इयान गेल्डरच्या निधनाची घोषणा करण्यासाठी मी ही पोस्ट करत आहे.

पत्नीने पोस्टमध्ये दिली निधनाची माहितीबेन डॅनियल यांनी लिहिले की, 'इयानला डिसेंबरमध्ये पित्त नलिकाच्या कर्करोगाचे निदान झाले आणि काल १.०७ वाजता त्याचे निधन झाले. त्यांची काळजी घेण्यासाठी मी सगळी कामं आटोपली होती पण इतक्या लवकर असं होईल याची आमच्यापैकी कुणालाही कल्पना नव्हती. ते माझे सामर्थ्य होते आणि आम्ही ३० वर्षांहून अधिक काळ एकमेकांचे सोबती आहोत. आम्ही रोज एकमेकांशी बोलायचो. ते सर्वात दयाळू, सर्वात उदार, उत्साही आणि प्रेमळ व्यक्ती होते.

ख्रिसमसच्या दरम्यानचा फोटो केला शेअरपोस्ट केलेल्या फोटोचा संदर्भ देत त्या पुढे म्हणाल्या की, 'हा फोटो ख्रिसमसच्या वेळी काढला होता जेव्हा मी त्याला हॉस्पिटलमधून घेऊन आले होते आणि ते सर्वात वाईट तीन आठवडे गेले होते तरीही तुम्ही हे करू शकता. त्यांचा आनंद आणि प्रेम चमकताना पहा. माझ्या प्रिय चियानी विश्रांती घ्या.

टॅग्स :गेम ऑफ थ्रोन्स