Join us
Daily Top 2Weekly Top 5

'टायटॅनिक' फेम लियोनार्डो डिकैप्रियोने केली एंगेजमेंट?, गर्लफ्रेंडसोबतचा फोटो झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 16:13 IST

Leonardo DiCaprio : लियोनार्डो डिकैप्रियो त्याच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा जास्त पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतो. गेल्या काही दिवसांपासून त्याचं नाव एका मॉडेलसोबत जोडलं जातंय.

लियोनार्डो डिकैप्रियो त्याच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा जास्त पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतो. गेल्या काही दिवसांपासून त्याचं नाव एका मॉडेलसोबत जोडलं जातंय. या मॉडेलचं नाव आहे विटोरिया सेरेटी. इतकंच नाही तर म्हणे त्या दोघांनी एंगेजमेंट केल्याचंही बोललं जातंय. ही चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा विटोरिया सेरेटी हिने एंगेजमेंट फिंगरमधील रिंग फ्लॉन्ट केली.

लियोनार्डो डिकैप्रियोचं नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो विटोरिया सेरेटीला डेट करत आहे. दोघे अनेकदा एकत्र पार्टी करताना दिसले आहेत. आता गुरुवारी सोशल मीडियावर या कपलचा लेटेस्ट फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत. लियोनार्डो आणि विटोरियाला लॉस अँजेलिसमधील एका मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये पाहिले होते. या फोटोत विटोरियाच्या हातातील रिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेतले. या ती रिंग फ्लॉन्ट करताना दिसली.

विटोरिया सेरेटीचा नवीन फोटो होतोय व्हायरलविटोरियाचा फोटो पाहून चाहते त्या दोघांनी एंगेजमेंट केल्याचा तर्कवितर्क लावत आहेत. एका युजरने लिहिले की, ही साखरपुड्याची अंगठी वाटत आहे आणि असे असेल तर त्यांचं अभिनंदन. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, अभिनंदन दोघांनी एंगेजमेंट केली.

२३ वर्षे लहान आहे विटोरियाहॉलिवूड स्टार लियोनार्डो डिकैप्रियो त्याच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या अभिनेत्रींना डेट करण्यासाठी प्रसिद्ध आहे. विटोरिया सेरेटीदेखील लियोनार्डो डिकैप्रियोपेक्षा वयाने २३ वर्षे लहान आहे. विटोरिया सेरेटी इटालियन मॉडेल आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.