Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shocking! वयाच्या १५ व्या वर्षी या अभिनेत्रीवर झाला होता बलात्कार, आईनेच विकलं होतं ३ लाखाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 13:22 IST

या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील धक्कादायक गोष्ट सांगितली आहे.

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री डेमी मूर हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. डेमी नुकतीच टेलिव्हिजन शो 'गुड मार्निंग अमेरिका'मध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिनं सांगितलं की, वयाच्या १५ व्या वर्षी तिच्या आईनं तिला ५०० डॉलर (३ लाख)साठी एका व्यक्तीला विकलं होतं. याच व्यक्तीनं तिच्यावर बलात्कार केला.

डेमी मूरनं सांगितलं की, तिची आई दारू खूप पित होती. त्यामुळे तिने एकदा सुसाईड करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर डेमी म्हणाली की, मला वाटत नाही जर माझी आई शुद्धीत असती तर तिने त्या व्यक्तीला माझ्यावर रेप करण्याची परवानगी दिली असती. डेमी या वक्तव्यामुळे सातत्यानं चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर कुणी तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतंय तर कुणी प्रश्नांचा भडीमारा करत आहे.  

यापूर्वी डेमीने हार्पर्स बाजारला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, एस्टन कुचरने लग्नानंतर तिला फसवलं. डेमीने एस्टनसोबत २००५ साली लग्न केलं होतं.

हे डेमीचं तिसरं लग्न होतं. एस्टन डेमी पेक्षा वयाने १५ वर्षे लहान आहे. डेमी सांगितलं होतं की, तिचा नवरा एस्टन तिला बाथटबमध्ये दोन महिलांसोबत दिसला होता आणि तो तिला फसवत होता.

डेमी व एस्टन २०१३ साली विभक्त झाले होते. डेमीचे एकूण तीन लग्न झालं आहेत. तिचं पहिलं लग्न फ्रेडी मूरसोबत १९८० साली झालं होतं आणि ५ वर्षांनंतर ते दोघं विभक्त झाले. १९८७ साली डेमीने ब्रूस विल्ससोबत लग्न केल्यानंतर २००० साली वेगळे झाले.

डेमीच्या गर्भातच बाळाचं निधन झालं होतं. याबद्दल ती म्हणाली, माझ्यासाठी हे खूप गरजेचं आहे की मी नैसर्गिकरित्या बाळाचा जन्म करायचा आहे. मला प्रत्येक गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे. त्यासोबत मला वेदनाही सहन करायच्या होत्या.

प्रामाणिकपणे सांगू तर मला जीवनातील एकही क्षण मिस करायचा नव्हता, याचा अर्थ वेदना सहन करणंही असू शकते.