BIRTHDAY SPECIAL : ज्युलिया रॉबर्ट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 16:06 IST
‘प्रिटी वुमन’ स्टार ज्युलिया रॉबर्ट्सचा आज वाढदिवस. ‘अमेरिकाज् स्विटहार्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेली ही हॉलीवूड अभिनेत्री ४९ वर्षांची झाली आहे. तिच्याविषयी ...
BIRTHDAY SPECIAL : ज्युलिया रॉबर्ट्स
‘प्रिटी वुमन’ स्टार ज्युलिया रॉबर्ट्सचा आज वाढदिवस. ‘अमेरिकाज् स्विटहार्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेली ही हॉलीवूड अभिनेत्री ४९ वर्षांची झाली आहे. तिच्याविषयी सांगावे तेवढे कमी आहे. अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ज्युलिया जगातील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक मानली जाते. अशा या ज्युलिया रॉबर्ट्सबद्दल तिच्या वाढदिवासानिमित्त जाणून घ्या दहा रंजक गोष्टी...१. ज्युलियाला लहानपणी पशुवैद्य व्हायचे होते. शाळेत असताना ती स्कुल बँडमध्ये सनई वाजवत असे.२. ‘क्राईम स्टोरी’ (१९८७) या मालिकेद्वारे तिचे टीव्हीवर आगमन झाले. यामध्ये तिने एका किशोरवयीन बलात्कार पीडित मुलीची भूमिका केली होती.३. ज्युलियाचे मोठ्या पडद्यावर पदार्पण ‘सॅटिस्फॅक्शन’ (१९८८) या चित्रपटातून झाले. लियाम नेसन आणि जस्टिन बेटमन हे तिचे सहकलाकार होते. प्रिटी वुमन४. ‘मिस्टिक प्लाझा’ (१९८८), ‘स्टील मॅग्नोलियास’ (१९८८) आणि ‘प्रिटी वुमन’ (१९९०) या चित्रपटांनी तिला लोकप्रियतेच्या शिखरांवर नेऊन बसवले. ‘स्टील मॅग्नोलियास’ व ‘प्रिटी वुमन’ या दोन्ही चित्रपटांसाठी तिला ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्काराने नावाजण्यात आले होते तर आॅस्करचे नामांकन मिळाले होते. अखेर २००० सालच्या ‘एरिन ब्रोकोविच’मधील भूमिकेसाठी ती आॅस्कर पुरस्काराची विजेती ठरली.५. तिचा भाऊ एरिकसुद्धा अभिनेता असून दोघांनी १९८९ साली ‘ब्लड रेड’ नावाच्या सिनेमात एकत्र काम केलेले आहे. अमेरिकाज स्विटहार्ट६. ‘व्हॅलेंटाईन्स डे’मध्ये (२०१०) तिने पुतणी एमा रॉबर्ट्ससोबत काम केले होते. परंतु त्यापूर्वीदेखील दोघींनी ‘अमेरिकाज् स्विटहार्टस्’ (२००१) या चित्रपटात काम केले होते. या सिनेमात एमा अतिरिक्त कलाकार होती.७. तिन्ही मुले - जुळे हेजल व फिनाऊस आणि हेन्री - आणि पती डॅनियल मोडरच्या नावाची अद्याक्षरे अंगावर गोंदवून घेतलेली आहेत.८. ज्युलिया एक उत्तम घोडेस्वार असून ‘रनवे ब्राईड’ सिनेमात तिने स्वत: घोडा चालवला आहे. ज्युलिया अँड फॅमिली९. जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर ज्युलियाने चित्रपटातून नाही तर एका म्युझिक व्हिडियोद्वारे पुनरामगन केले होते. डेव्ह मॅथ्यूज् बँडचा तो व्हिडिओ होता.१०. तिच्या प्रोडक्शन कंपनीचे नाव ‘रेड ओम’ (Red Om) हे तिच्या पतीच्या नावाच्या इंग्रजी स्पेलिंगचे (Moder) ‘उलट स्पेलिंग’ आहे.