Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॉलिवूडचा 'अवतार' ठरतोय बॉक्स ऑफिसचा धुरंधर! १७ दिवसांतच भारतात केली बक्कळ कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 14:47 IST

बॉलिवूडला डावलून हॉलिवूडचा 'अवतार' बॉक्स ऑफिसचा धुरंधर ठरत आहे. या सिनेमाने १७ दिवसांतच भारतात बक्कळ कमाई केली आहे. जेम्स कॅमेरॉन यांच्या 'अवतार : फायर अँड अॅश' या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

Avatar Fire And Ash: सध्या सर्वत्र रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाची प्रचंड चर्चा आहे. प्रदर्शित होताच या सिनेमाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं. मात्र बॉलिवूडच्या 'धुरंधर' सिनेमाला हॉलिवूडचा अवतार चांगली टक्कर देताना दिसत आहे. बॉलिवूडला डावलून हॉलिवूडचा 'अवतार' बॉक्स ऑफिसचा धुरंधर ठरत आहे. या सिनेमाने १७ दिवसांतच भारतात बक्कळ कमाई केली आहे. जेम्स कॅमेरॉन यांच्या 'अवतार : फायर अँड अॅश' या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

'अवतार'च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागानंतर प्रेक्षक 'अवतार ३'च्या प्रतिक्षेत होते. १९ डिसेंबरला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. पण तेव्हा भारतात फक्त धुरंधरची हवा होती. त्यामुळे धुरंधरच्या तुलनेत 'अवतार'ला कमी शो मिळत होते. मात्र असं असूनही या सिनेमाने १७ दिवसांत चांगली कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने १९ कोटींचा गल्ला जमवला. त्यानंतर पहिल्या वीकेंडला 'अवतार'ने जवळपास ४७ कोटींची कमाई केली होती. मात्र त्यानंतर सिनेमाच्या कमाईत घट होताना दिसून आली. पहिल्या आठवड्यात 'अवतार'ने १०९ कोटींचा बिजनेस केला. तर दुसऱ्या आठवड्यात ५० कोटीच सिनेमाला कमावता आले. 

तिसऱ्या आठवड्यातही 'अवतार'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. १७ दिवसांत या सिनेमाने भारतात १७४ कोटी कमावले आहेत. 'अवतार' ही जगातील सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट फ्रँचायझी आहे. पहिला भाग २००९ मध्ये प्रदर्शित झाला आणि दुसरा भाग 'अवतार: द वे ऑफ वॉटर' २०२२ मध्ये प्रदर्शित झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Hollywood's 'Avatar' Dominates Indian Box Office, Earns Big in 17 Days

Web Summary : Despite competition, 'Avatar: Fire and Ash' has grossed ₹174 crore in India within 17 days. The film faced initial competition from 'Dhurandar' but sustained strong audience interest, proving the franchise's global appeal.
टॅग्स :हॉलिवूडबॉक्स ऑफिस कलेक्शनसिनेमा